Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक आॅफ बडोदाच्या सहायक महाव्यवस्थापकास अटक

बँक आॅफ बडोदाच्या सहायक महाव्यवस्थापकास अटक

राजधानी दिल्लीतील बँक आॅफ बडोदाच्या अशोक विहार शाखेतून ६००० कोटी रुपयांची रक्कम विदेशात पाठविण्यात आल्याच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात सीबीआयने बँक

By admin | Published: October 14, 2015 12:29 AM2015-10-14T00:29:04+5:302015-10-14T00:29:04+5:30

राजधानी दिल्लीतील बँक आॅफ बडोदाच्या अशोक विहार शाखेतून ६००० कोटी रुपयांची रक्कम विदेशात पाठविण्यात आल्याच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात सीबीआयने बँक

Armed with Assistant General Manager of Bank of Baroda | बँक आॅफ बडोदाच्या सहायक महाव्यवस्थापकास अटक

बँक आॅफ बडोदाच्या सहायक महाव्यवस्थापकास अटक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील बँक आॅफ बडोदाच्या अशोक विहार शाखेतून ६००० कोटी रुपयांची रक्कम विदेशात पाठविण्यात आल्याच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात सीबीआयने बँक आॅफ बडोदाचा सहायक महाव्यवस्थापक आणि विदेशी चलन विभागप्रमुख या दोघांना तर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यासह चार जणांना मंगळवारी अटक केली.
सीबीआयने बँक आॅफ बडोदा बँकेच्या अशोक विहार शाखेचे सहायक महाव्यवस्थापक एस. के. गर्ग आणि विदेशी चलन विभागाचा प्रमुख जैनिश दुबे या दोघांना भादंवि आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली अटक केली. हा घोटाळा उजेडात आल्यानंतर सीबीआयने रविवारी गर्ग व दुबेच्या निवासस्थानांसह बँकेच्या शाखांवर छापे घातले होते.
५९ चालू बँक खातेधारक आणि निनावी बँक अधिकाऱ्यांनी विदेशात आणि मुख्यत्वे हाँगकाँगमध्ये पैसा पाठविण्याचा कट रचला आणि बँकिंग नियम धाब्यावर बसवून न झालेल्या निर्यातीच्या पेमेंट बिलाच्या नावावर ६००० कोटी रुपये विदेशात पाठविल्याचा आरोप सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. तत्पूर्वी ईडीने एचडीएफसी बँकेच्या विदेशी चलन विभागात कार्यरत असलेला कमल कालरा याच्यासह चंदन भाटिया, गुरुचरण सिंग धवन आणि संजय अग्रवाल या चौघांना आपल्या कार्यलयात चौकशीसाठी बोलावून घेतल्यानंतर सायंकाळी अटक केली.
नुकत्याच उघडकीस आलेल्या आणि सीबीआयमार्फत चौकशी सुरू असलेल्या या आर्थिक गुन्'ात एकूण ५९ बनावट कंपन्या सामील आहेत. त्यांपैकी १५ बनावट कंपन्यांसाठी हे चारही आरोपी दलाल म्हणून काम करीत होते, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. आयातीच्या बनावट बिलांचे पेमेंट करण्यासाठी बँकेच्या विविध खात्यांद्वारे तब्बल ६००० कोटी रुपये हाँगकाँगला पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. हे व्यापार-आधारित मनी लाँडरिंग प्रकरण आहे, ज्यात आरोपी व्यापाऱ्यांनी अवैध कमाईसाठी जकात शुल्क आणि अन्य करांची चोरी केली आहे, असे ईडीने म्हटले आहे.
कमल कालरा हा विदेशात पाठविण्यात आलेल्या प्रती अमेरिकन डॉलरवर ३० ते ५० पैसे कमिशनच्या बदल्यात बँक आॅफ बडोदामार्फत पैसे विदेशात पाठविण्यासाठी भाटिया आणि अग्रवाल यांना मदत करीत होता. तर भाटिया हा भारतात अशा बनावट कंपन्या स्थापन करणे आणि हाँगकाँगमधील कंपन्यांना पैसे पाठविण्यात एक सहायक म्हणून तयार कपड्यांचा निर्यातदार असलेल्या धवन याच्यासोबत काम करीत होता, असे ईडीच्या सूत्रांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Armed with Assistant General Manager of Bank of Baroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.