Lokmat Money > बिझनेस न्यूज > मंदीतही संधी! देशात दरवर्षी १.३२ लाख नोकऱ्या; Amazon भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक

मंदीतही संधी! देशात दरवर्षी १.३२ लाख नोकऱ्या; Amazon भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक

मॅन्युफॅक्चरींग, इंजिनिअरींग, दूरसंचार क्षेत्रात प्रामुख्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 04:00 PM2023-05-18T16:00:13+5:302023-05-18T16:13:44+5:30

मॅन्युफॅक्चरींग, इंजिनिअरींग, दूरसंचार क्षेत्रात प्रामुख्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत

Around 1.32 Lakh Jobs Every Year! Amazon’s Huge Investment Plans In India – Here’s What AWS CEO Adam Selipsky Said | मंदीतही संधी! देशात दरवर्षी १.३२ लाख नोकऱ्या; Amazon भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक

मंदीतही संधी! देशात दरवर्षी १.३२ लाख नोकऱ्या; Amazon भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक

नवी दिल्ली - जगातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने भारतातील क्लाउड सर्व्हिसेसमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, क्लाउड सर्व्हिस देणारी अमेझॉन वेब सर्व्हिसेज (एमब्ल्यूएस) ने १,०५,६०० कोटी रुपये (१२.७ अब्ज डॉलर) ची गुंतवणूकीची घोषणा केली आहे. पुढील ८ वर्षांत कंपनीकडून होत असलेल्या या गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतात दरवर्षी १,३१,७०० नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे, कंपनीचं ही घोषणा भारतात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे, जागतिक मंदीतही भारतात संधी उपलब्ध असणार आहेत.

मॅन्युफॅक्चरींग, इंजिनिअरींग, दूरसंचार क्षेत्रात प्रामुख्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कंपनी नव्या गुंतवणुकीसह प्रामुख्याने इंफ्रास्ट्रक्चरचा पाया आणखी मजबूत करणार आहे. अमेझॉन कंपनीने सन २०१६ ते २०२२ या ६ वर्षांच्या कालावधीत भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. तब्बल ३.७ अब्ज डॉलर म्हणजेच ३०,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक आत्तापर्यंत कंपनीने केली आहे. मात्र, आता लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मोठी आर्थिक उलाढाल कंपनी भारतात करत आहे.

भारतात क्लाऊड संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरची मागणी पाहता ही गुंतवणूक करण्यात येत आहे. डाटा सेंटर इंफ्रास्ट्रक्चरच्या गुंतवणुकीतून भारतीय व्यापारात दरवर्षी सरासरी १,३१,७०० नोकऱ्यांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. या नव्या गुंतवणुकीसह अमेझॉन कंपनीची भारतातील गुंतवणूक ही १,३६,५०० (१६.४ अब्ज डॉलर) पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. कंपनीचे भारतात २ डाटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. पहिल्याच वर्षी २०१६ मध्ये मुंबईत एक सुरू करण्यात आले होते, तर दुसरे डाटा सेंटर नोव्हेंबर २०२२ मध्ये हैदराबाद येथे सुरू करण्यात आलं आहे. 

'AWS' चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), अॅडम सेलिपस्की म्हणाले, ''AWS एक डिजिटल पॉवरहाऊस म्हणून भारताच्या आर्थिक वाढीसाठी दीर्घकाळापासून कार्यरत आहे. येथे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आम्ही 2016 पासून केलेली ही भरभराट पाहून मी प्रेरीत झालो आहे.'' ते पुढे म्हणाले, इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, जागतिक अनिश्चिततेच्या काळातur भारत देश जगात "उज्ज्वल स्थान" प्राप्त करुन आहे, जेथे व्यवसाय अधिकाधिक पुराणमतवादी होत आहेत, भारतात व्यवसाय आणि उद्योगांद्वारे क्लाउड कॉम्प्युटिंगचा अधिकाधिक अवलंब करण्यास लक्षणीय वाव आहे. 

क्लाऊड म्हणजे काय

क्लाऊड कंप्युटिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून देण्यात येणारी सेवा. यामध्ये, युजर्संना इंटरनेटच्या मदतीने एका सर्व्हरवर डाटा स्टोअरेज करण्याची सुविधा मिळते. भारतात गेल्या काही दिवसांत क्लाऊड कंप्युटिंग सर्व्हिसिंगची डिमांड वाढत आहे. ते पाहूनच अमेझॉनने एवढ्या मोठ्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. यामुळे, मुख्यत्वे उद्योजकांना फायदा होणार आहे. 
 

Web Title: Around 1.32 Lakh Jobs Every Year! Amazon’s Huge Investment Plans In India – Here’s What AWS CEO Adam Selipsky Said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.