Join us  

मान्सूनच्या आगमनाने शेअर बाजारात बहार

By admin | Published: June 09, 2016 5:05 AM

केरळ किनारट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजारात बहार आली.

मुंबई : केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजारात बहार आली. विदेशी संस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीचाही बाजाराला लाभ झाला. शेअर बाजारातील तेजीचा हा सलग दुसरा दिवस होता.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो घसरला. तथापि, नंतर त्याने ही झीज भरून काढली. सत्राच्या अखेरीस १0.0९९ अंकांची अथवा 0.0४ टक्क्याची वाढ नोंदवून तो २७,0२0.६६ अंकांवर बंद झाला. २८ आॅक्टोबर नंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.६0 अंकांनी अथवा 0.0८ टक्क्याने वाढून ८,२७७.0५ अंकांवर बंद झाला. व्यापक बाजारांतही तेजीचा कल दिसून आला. बीएसई स्मालकॅप निर्देशांक 0.८९ टक्क्यांनी, तर मिडकॅप निर्देशांक 0.५२ टक्क्याने वाढला. पीएसयू, आॅटो, रिअल्टी, कंझुमर ड्युरेबल्स, आॅईल अ‍ॅण्ड गॅस, मेटल, एफएमसीजी आणि बँकिंग या क्षेत्रांतील कंपन्यांचे समभाग वाढले. आयटी आणि टेक या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मात्र घसरले. जागतिक पातळीवर आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहावयास मिळाला. जपानचा निक्केई 0.९३ टक्क्याने वाढला. हाँगकाँगचा हँग सेंग 0.१४ टक्क्याने घसरला. चीनचा शांघाय कंपोजिट 0.३0 टक्क्याने खाली आला. युरोपीय बाजारांत सकाळी नरमाईचा कल दिसून आला. युरो क्षेत्रात आर्थिक वाढीला गती देण्यासाठी युरोपीय केंद्रीय बँक मूलभूत प्रोत्साहन उपायांची तयारी करीत आहे.>पीएसयूला मागणीपीएसयू, आॅटो, रिअल्टी, कंझुमर ड्युरेबल्स, आॅईल अ‍ॅण्ड गॅस, मेटल, एफएमसीजी आणि बँकिंग या क्षेत्रांतील कंपन्यांचे समभागांना मागणीजागतिक पातळीवर आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहावयास मिळाला. जपानचा निक्केई 0.९३ टक्क्याने वाढला. हाँगकाँगचा हँग सेंग 0.१४ टक्क्याने घसरला.