Join us

आरसेप करार हा भारताच्या हिताचा - पानगढिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 5:12 AM

बँकॉकमध्ये झालेल्या परिषदेत आरसेप करारावर भारताने सह्या न करण्याचा निर्णय घेतल्याने बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येण्याचे टाळतील, असा इशारा नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी दिला आहे.

नवी दिल्ली : बँकॉकमध्ये झालेल्या परिषदेत आरसेप करारावर भारताने सह्या न करण्याचा निर्णय घेतल्याने बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येण्याचे टाळतील, असा इशारा नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी दिला आहे.सध्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येऊ शकतात. पण त्यासाठी त्यांना आसियान बाजारपेठेमध्ये करमुक्त प्रवेश मिळायला हवा. तसे झाले, तरच त्यांना भारतात स्थिर होता येईल. मात्र त्यासाठी भारताने आरसेप करारावर सह्या करणे आवश्यक आहे, असे सांगून पानगढिया म्हणाले, १५ देशांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या तर बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याऐवजी त्यांच्याकडे जातील. आरसेपमुळे भारताचा फायदाच होणार आहे. यात भारत, जपान, चीन, दक्षिण कोरिया, आॅस्ट्रेलिया, न्यू झीलंड आदी१0 आसिआन देश आहेत.