Lokmat Money > बिझनेस न्यूज > कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात उलथापालथ होणार, एका सर्वेक्षणात ६0 टक्के उद्योगांनी व्यक्त केले मत

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात उलथापालथ होणार, एका सर्वेक्षणात ६0 टक्के उद्योगांनी व्यक्त केले मत

रिटेल, बीएफएसआय, आरोग्य आणि कृषी या क्षेत्राशी संबंधित ५00 तज्ज्ञांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. त्यावर आधारित ‘कॅन इंटरप्राईज इंटेलिजन्स बी क्रिएटेड आर्टिफिशिअली? अ सर्व्हे आॅफ इंडियन इंटरप्रायजेस’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:04 AM2020-09-05T06:04:56+5:302020-09-05T06:05:16+5:30

रिटेल, बीएफएसआय, आरोग्य आणि कृषी या क्षेत्राशी संबंधित ५00 तज्ज्ञांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. त्यावर आधारित ‘कॅन इंटरप्राईज इंटेलिजन्स बी क्रिएटेड आर्टिफिशिअली? अ सर्व्हे आॅफ इंडियन इंटरप्रायजेस’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

Artificial intelligence will revolutionize business, according to a survey by 60 per cent of industries | कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात उलथापालथ होणार, एका सर्वेक्षणात ६0 टक्के उद्योगांनी व्यक्त केले मत

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात उलथापालथ होणार, एका सर्वेक्षणात ६0 टक्के उद्योगांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली : आगामी दोन ते तीन वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्या व्यवसायात संपूर्ण उलथापालथ होईल, असे मत ६0 टक्के भारतीय उद्योगांनी व्यक्त केले आहे. औद्योगिक संघटना नासकॉम आणि सल्लागार संस्था ईवाय यांनी संयुक्तरीत्या केलेल्या एका सर्वेक्षणात हे मत उद्यमींनी व्यक्त केले आहे.
रिटेल, बीएफएसआय, आरोग्य आणि कृषी या क्षेत्राशी संबंधित ५00 तज्ज्ञांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. त्यावर आधारित ‘कॅन इंटरप्राईज इंटेलिजन्स बी क्रिएटेड आर्टिफिशिअली? अ सर्व्हे आॅफ इंडियन इंटरप्रायजेस’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणाऱ्यांपैकी ७0 टक्के भारतीय उद्योगांना त्याचे लक्षणीय परिणाम दिसून आले आहेत.
नासकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष यांनी सांगितले की, सर्वच उद्योग क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अंमलबजावणीमुळे केवळ स्पर्धात्मकताच वाढणार आहे, असे नव्हे; दीर्घकालीन मूल्यांची निर्मितीही त्यातून होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत बीएफएसआय संस्था (३६ टक्के) आघाडीवर आहेत. त्याखालोखाल रिटेल (२५ टक्के), आरोग्य (२0 टक्के) आणि कृषी (८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
ईवाय इंडियाचे भागीदार नितीन भट्ट यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मार्गात काही आव्हानेही आहेत. गुणवत्तापूर्ण डेटाची उपलब्धता, उद्योगाचे योग्य पातळीवरील डिजिटलीकरण आणि भागीदार नेटवर्कची परिपक्वता यांचा त्यात समावेश आहे.

उत्तरदायित्व, नैतिक वापर यासारख्याही काही चिंतेच्या गोष्टी
समजून घेण्यातील अडथळे, उत्तरदायित्व आणि नैतिक वापर यासारख्याही काही चिंतेच्या गोष्टी आहेत. लोक आणि संस्कृती यांचेही काही प्रश्न यातून निर्माण होणार आहेत. सर्वेक्षणातील ४0 टक्के सहभागीतांनी श्रमशक्तीच्या संभाव्य विस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली.

३२ टक्के सहभागीतांनी सांस्कृतिक अडथळ्यांकडे अंगुलीनिर्देश केला. ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब केलेला आहे, अशांंपैकी १९ टक्के उत्तदात्यांनी सांगितले की, श्रमशक्तीचे विस्थापन हे आव्हान होते. ५५ टक्के उत्तरदात्यांना सांस्कृतिक घटक आव्हानात्मक वाटला.

Web Title: Artificial intelligence will revolutionize business, according to a survey by 60 per cent of industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.