सुहास वाघमारे, नांदुरा
(जि. बुलडाणा)
कृत्रिम रेतनाच्या सेवाशुल्कात १ आॅक्टोबरपासून दुपटीने वाढ करण्यात येत आहे. आधीच दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाकडे वळावे असा उपदेश देणाऱ्या शासकीय यंत्रनेने गेल्या दोन ते तीन वर्षापासून दुष्काळसदृश स्थितीतमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना व प्रामुख्याने पशुपालकांना देत आहे. परंतु न रुचणारा निर्णय घेत शासनाने एक आॅक्टोबरपासून कृत्रिम रेतनाचे सेवाशुल्क वीस रुपयांवरुन दुप्पट म्हणजे चाळीस रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शासनाने १४ सप्टेंबरला एका आदेश काढला होता. त्यामुळे आता १ आॅक्टोबरपासून पशुपालकाला प्रती कृत्रिम रेतन चाळीस रुपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.
सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीत होरपळलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी किंवा चारा छावण्या उभारण्यासाठी शासनाने अद्याप हवी तेवढी मदत दिली नाही. त्यामुळे पशुपालक शेतकरी आधीच त्रासले असताना हा निर्णय त्यांच्यासाठी आर्थिक भुर्दंड ठरणार आहे. याबाबत राज्य शासनाने फेरविचार करून वाढीव सेवा शुल्क रद्द करुन पुर्वीप्रमाणे वीस रुपये सेवा शुल्क आकारावेत अशी पशुपालकांची मागणी आहे.
कृत्रिम रेतनाचे सेवाशुल्क दुप्पट !
कृत्रिम रेतनाच्या सेवाशुल्कात १ आॅक्टोबरपासून दुपटीने वाढ करण्यात येत आहे. आधीच दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
By admin | Published: September 30, 2015 11:52 PM2015-09-30T23:52:33+5:302015-09-30T23:52:33+5:30