Lokmat Money > बिझनेस न्यूज > Home Loan: महागड्या होम लोनचा परिणाम, निवृत्तीच्या वयाच्या पुढे गेला EMI भरण्याचा कालावधी, आता हा आहे पर्याय  

Home Loan: महागड्या होम लोनचा परिणाम, निवृत्तीच्या वयाच्या पुढे गेला EMI भरण्याचा कालावधी, आता हा आहे पर्याय  

Home Loan EMI: जेव्हा जेव्हा आरबीआयने रेपो रेट वाढवला, तेव्हा तेव्हा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी होमलोनच्या व्याज दरांसोबत ईएमआय सातत्याने वाढवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:18 PM2023-03-28T23:18:31+5:302023-03-28T23:19:01+5:30

Home Loan EMI: जेव्हा जेव्हा आरबीआयने रेपो रेट वाढवला, तेव्हा तेव्हा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी होमलोनच्या व्याज दरांसोबत ईएमआय सातत्याने वाढवला आहे.

As a result of expensive home loans, extended EMI repayment period beyond retirement age, this is now an option | Home Loan: महागड्या होम लोनचा परिणाम, निवृत्तीच्या वयाच्या पुढे गेला EMI भरण्याचा कालावधी, आता हा आहे पर्याय  

Home Loan: महागड्या होम लोनचा परिणाम, निवृत्तीच्या वयाच्या पुढे गेला EMI भरण्याचा कालावधी, आता हा आहे पर्याय  

मे २०२२ पूर्वी बँकांपासून हाऊसिंग फायनान्स कंपन्यांपर्यंत सर्वजण स्वस्त होम लोनच्या वेगवेगळ्या ऑफर देत होते. होमलोनवरील व्याजदर घटून ६.५० या किमान पातळीवर आला होता. मात्र एप्रिल २०२२ मध्ये महागाई वाढून ७.८० टक्क्यांवर पोहोचली. तेव्हापासून रिझर्व्ह बँकेने महागाईवर लगाम कसण्यासाठी सुसाट वेगाने रेपो रेट वाढवण्यास सुरुवात केली आहे. सहा टप्प्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ४ टक्क्यांवरून वाढवून ६.५० टक्क्यांपर्यंत नेला आहे. जेव्हा जेव्हा आरबीआयने रेपो रेट वाढवला, तेव्हा तेव्हा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी होमलोनच्या व्याज दरांसोबत ईएमआय सातत्याने वाढवली आहे.

ज्या गृहखरेदीदारांनी ६.५० टक्के दराने होम लोन घेतलं होतं त्यांना ९ टक्के व्याजदराने ईएमआय भरावी लागत आहे. महागड्या ईएमआयमुळे त्यांच्या घराचं महिनाभराचं बजेट बिघडलं आहे. कुठल्याही गृह खरेदीदाराने ४० लाख रुपयांचं होम लोन हे २० वर्षांसाठी ६.५० टक्के व्याजदराने घेतलं असेल तेव्हा त्याला २९ हजार ८२३ रुपये ईएमआय भरावी लागत असेल.  मात्रा आता त्याच होम लोनवर त्याला ३३ हजार ५६८ रुपये ईएमआय भरावी लागत आहे. म्हणजेच दर महिन्याला ३ हजार ७४५ रुपयांनी ईएमआयचं ओझं वाढलं आहे. तर वर्षाला ४४ हजार रुपये अधिक ईएमआय भरावी लागत आहे. हे जेव्हा कर्जदार आपला ईएमआय वाढवतो आणि टेन्योर तेवढात ठेवतो. तेव्हा एवढा ईएमआय भरावा लागेल. मात्र बहुतांश गृहकर्जदारांसाठी ईएमआय भरण्याचा अवधी वाढत जातो. ईएमआय भरण्याचा अवधी हा निवृत्तीची वयोमर्यादा असलेल्या ६० वर्षांच्या पुढे जात आहे.

अशा परिस्थितीत गृहकर्जदाराकडे काही मोजके पर्याय आहे. ते पुढीलप्रमाणे. 
१ - ज्या होम बायरनी फ्लोटिंग रेटवर होमलोन घेतलेलं आहे. तसेच होम लोन भरण्याची अवढी वाढली आहे. त्यांनी आपली बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीशी बोलून वाढलेले व्याजदर घटवण्यासाठी विनंती केली पाहिजे. तसेच कर्जदाराने आपल्या बँकेकडून ईएमआयची रक्कम वाढवून टेन्योर घटवण्यासाठी सांगितलं पाहिजे.
२ - बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्या नव्या होम लोन ग्राहकांना स्वस्त दरात होमलोन देऊन आकर्षित करतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असला तर या सुविधेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. 
३- ईएमआयमद्ये थोडी वाढ केल्याने खिशावर थोडा ताण पडेल. मात्र महागड्या कर्जामुळे बँकेला दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या रकमेमध्ये थोडी घट होईल. तसेच ईएमआय भरण्याचा अवधीही घटेल. 

Web Title: As a result of expensive home loans, extended EMI repayment period beyond retirement age, this is now an option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.