Lokmat Money > बिझनेस न्यूज > तब्बल २४ टन साेने घेतले विकत; भारताचा साेन्याचा साठा ८२७ टनांवर 

तब्बल २४ टन साेने घेतले विकत; भारताचा साेन्याचा साठा ८२७ टनांवर 

२०२२च्या तुलनेत २०२३मध्ये आरबीआयने साेने खरेदी कमी केली हाेती. मात्र, यावर्षी पुन्हा माेठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. जगभरात यंदा साेन्याची मागणी वाढत आहे. चीनसह अनेक देशांनी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी केल्यामुळे दर माेठ्या प्रमाणात वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:02 PM2024-05-24T12:02:45+5:302024-05-24T12:06:08+5:30

२०२२च्या तुलनेत २०२३मध्ये आरबीआयने साेने खरेदी कमी केली हाेती. मात्र, यावर्षी पुन्हा माेठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. जगभरात यंदा साेन्याची मागणी वाढत आहे. चीनसह अनेक देशांनी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी केल्यामुळे दर माेठ्या प्रमाणात वाढला आहे.

As many as 24 tons gold were bought ; India's gold stock at 827 tonnes  | तब्बल २४ टन साेने घेतले विकत; भारताचा साेन्याचा साठा ८२७ टनांवर 

तब्बल २४ टन साेने घेतले विकत; भारताचा साेन्याचा साठा ८२७ टनांवर 

नवी दिल्ली : साेनेखरेदीसाठी देशांमध्ये लागलेली स्पर्धा यावर्षीही कायम आहे. भारताने यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल २४ टन साेने खरेदी केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी ८ टन साेनेखरेदी वाढली आहे. भारताकडील एकूण साेन्याचा साठा आता ८२७.६९ टनांवर पाेहाेचला आहे. विविध देशांच्या मध्यवर्ती बॅंकाच्या मार्फत साेने खरेदी हाेते. 

२०२२च्या तुलनेत २०२३मध्ये आरबीआयने साेने खरेदी कमी केली हाेती. मात्र, यावर्षी पुन्हा माेठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. जगभरात यंदा साेन्याची मागणी वाढत आहे. चीनसह अनेक देशांनी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी केल्यामुळे दर माेठ्या प्रमाणात वाढला आहे.

एवढे साेने खरेदी कशासाठी? 
भू-राजकीय तणावांमुळे निर्माण हाेणाऱ्या अस्थिरतेचा सामना करण्यासाठी अनेक देश साेने खरेदी करतात. यावर्षी जगभरात २९० टन साेने खरेदी २०२४च्या पहिल्या तिमाहीत झाली आहे. सर्वाधिक साेने खरेदी चीनने केली आहे.

१६ टन साेने खरेदी गेल्या वर्षी जानेवारी-एप्रिल कालावधीत हाेती.

२४ टन साेने यावर्षी याच कालावधीत खरेदी केले आहे.

आरबीआयकडील साेन्याचा साठा
डिसेंबर २०२०      ६७६.७ टन
डिसेंबर २०२१      ७५४.१ टन
डिसेंबर २०२२      ८६७.४ टन
डिसेंबर २०२३      ८०३.६ टन
एप्रिल २०२४      ८२७.७ टन

काेणाकडे किती 
साठा? (टाॅप टेन)
अमेरिका    ८,१३३ टन
जर्मनी    ३,३५२ टन
इटली    २,४५१ टन
फ्रान्स    २,४३६ टन
रशिया    २,३३२ टन
चीन    २,२६२ टन
स्वित्झर्लंड    १,०४० टन
जापान    ८४५ टन
भारत     ८२७ टन
नेदरलॅंड     ६१२ टन

Web Title: As many as 24 tons gold were bought ; India's gold stock at 827 tonnes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं