Join us

तब्बल २४ टन साेने घेतले विकत; भारताचा साेन्याचा साठा ८२७ टनांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:02 PM

२०२२च्या तुलनेत २०२३मध्ये आरबीआयने साेने खरेदी कमी केली हाेती. मात्र, यावर्षी पुन्हा माेठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. जगभरात यंदा साेन्याची मागणी वाढत आहे. चीनसह अनेक देशांनी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी केल्यामुळे दर माेठ्या प्रमाणात वाढला आहे.

नवी दिल्ली : साेनेखरेदीसाठी देशांमध्ये लागलेली स्पर्धा यावर्षीही कायम आहे. भारताने यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल २४ टन साेने खरेदी केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी ८ टन साेनेखरेदी वाढली आहे. भारताकडील एकूण साेन्याचा साठा आता ८२७.६९ टनांवर पाेहाेचला आहे. विविध देशांच्या मध्यवर्ती बॅंकाच्या मार्फत साेने खरेदी हाेते. 

२०२२च्या तुलनेत २०२३मध्ये आरबीआयने साेने खरेदी कमी केली हाेती. मात्र, यावर्षी पुन्हा माेठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. जगभरात यंदा साेन्याची मागणी वाढत आहे. चीनसह अनेक देशांनी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी केल्यामुळे दर माेठ्या प्रमाणात वाढला आहे.

एवढे साेने खरेदी कशासाठी? भू-राजकीय तणावांमुळे निर्माण हाेणाऱ्या अस्थिरतेचा सामना करण्यासाठी अनेक देश साेने खरेदी करतात. यावर्षी जगभरात २९० टन साेने खरेदी २०२४च्या पहिल्या तिमाहीत झाली आहे. सर्वाधिक साेने खरेदी चीनने केली आहे.

१६ टन साेने खरेदी गेल्या वर्षी जानेवारी-एप्रिल कालावधीत हाेती.

२४ टन साेने यावर्षी याच कालावधीत खरेदी केले आहे.

आरबीआयकडील साेन्याचा साठाडिसेंबर २०२०      ६७६.७ टनडिसेंबर २०२१      ७५४.१ टनडिसेंबर २०२२      ८६७.४ टनडिसेंबर २०२३      ८०३.६ टनएप्रिल २०२४      ८२७.७ टन

काेणाकडे किती साठा? (टाॅप टेन)अमेरिका    ८,१३३ टनजर्मनी    ३,३५२ टनइटली    २,४५१ टनफ्रान्स    २,४३६ टनरशिया    २,३३२ टनचीन    २,२६२ टनस्वित्झर्लंड    १,०४० टनजापान    ८४५ टनभारत     ८२७ टननेदरलॅंड     ६१२ टन

टॅग्स :सोनं