Join us  

मंदीच्या भीतीने तब्बल ३४.२२ टन सोने खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 9:27 AM

आरबीआयने वाढत्या महागाई आणि जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सोन्यात मोठी गुंतवणूक केली आहे.

नवी दिल्ली : आरबीआयने वाढत्या महागाई आणि जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सोन्यात मोठी गुंतवणूक केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात, आरबीआयने ३४.२२ टन सोने खरेदी केले आहे. त्यामुळे भारताकडे सोन्याचा एकूण साठा ७९४.६४ टन झाला आहे. वर्षभरात देशातील सोन्याच्या साठ्यात सुमारे ५% वाढ झाली आहे. भारताच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यातील सोन्याचा हिस्सा मार्च २०२३ मध्ये ७.८१ टक्के झाला आहे. 

जगात ‘व्हाइट गोल्ड’चा सर्वाधिक साठा कुणाकडे? ज्या देशाकडे जास्त लिथियम तो ठरणार ‘राजा’

सोने ठेवले कुठे?

गेल्या ५ वर्षांमध्ये आरबीआयने सोने खरेदीत सतत वाढ केली आहे. एकूण सोन्याच्या साठ्यापैकी ४३७.२२ टन सोने परदेशात बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातच ३०१.१० टन सोने ठेवण्यात आले आहे.

 सर्वाधिक सोने खरेदी कुणी केली?  तुर्की -१४०.९ चीन -१२०.१सिंगापूर-६८.७उझबेकिस्तान-४३.९भारत -३४.२इराक-३३.९

टॅग्स :सोनंचांदी