नवी दिल्ली - गेल्या काही वर्षात जगात अब्जाधीशांची संख्या वाढत आहे,. भारतातील श्रीमंतांच्या यादीतही भर पडत चालली आहे. जगभरात सध्या तब्बल ३,९५,०७० लोकांकडे प्रत्येकी सरासरी सुमारे ३ कोटी डॉलर्स म्हणजेच २.४८ अब्ज रुपयांची संपत्ती आहे. अल्ट्राटा वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट २०२३ च्या ताज्या अहवालातून ही आकडेवारी पुढे आली आहे.
यातून एक विशेष निरीक्षण पुढे आले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात मोठे परिणाम दिसून आले. अन्नपुरवठा खंडित झाल्याने काही देशात काही गोष्टी महागल्या तर पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये त्या स्वस्त झाल्या. परंतु या युद्धानंतर भारत वगळता सर्व बड्या देशांमधील अतिश्रीमंतांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये जगातील सर्वाधिक अतिश्रीमंत लोक राहतात. तर जपान आणि हाँगकाँग या देशांमधील अतिश्रीमंत लोकांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झालेली दिसते.
पश्चिम आशियात वाढ - खनिज तेलाच्या साठ्यांच्या बाबतीत श्रीमंत असलेल्या पश्चिम आशियात राहणाऱ्या अतिश्रीमंतांच्या संख्येत मागील वर्षी १५.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. - या पाठोपाठ मध्यपूर्वेतील देशांमध्ये २१,६४० अतिश्रीमंत राहतात. लॅटिन अमेरिका आणि द कॅरेबियन ही सध्या अतिश्रीमंतांच्या पसंतीची ठिकाणे म्हणून उदयाला येत आहेत.
भारतातील सर्वाधिक अब्जाधीश मुंबईत- भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी मुंबईत राहतात. - हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार मुंबईत देशातील ७२ अब्जाधीश राहतात तर दिल्लीत ५१ अब्जाधीशांची घरे आहेत.
आशिया दुसऱ्या स्थानीजागतिक पातळीवर विचार केला असता उत्तर अमेरिकेत सर्वाधिक अतिश्रीमंत व्यक्ती राहतात. या सर्वांची एकूण आकडेवारी १,४२,९९० इतकी आहे. २०२१ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी घटली आहे. अतिश्रीमंतांच्या बाबतीत आशिया खंडाचा क्रमांक दुसरा लागतो. इथे एकूण १,०८,३७० इतके अतिश्रीमंत आहेत. या ठिकाणीही अतिश्रीमंतांची आकडेवारी १०.९ टक्क्यांनी घटली आहे.याबाबत युरोप तिसऱ्या स्थानी आहे जिथे एकूण अतिश्रीमंतांची संख्या १,००,८५० इतकी आहे. यात ७.१ टक्क्यांची घट झाली आहे.
- ५.४% इतकी घट जागतिक पातळीवरील अतिश्रीमंतांच्या संख्येत झाली आहे. - ४५लाख कोटी डॉलर्स इतकी संपत्ती सध्या जगभरातील अतिश्रीमंतांकडे शिल्लक उरली आहे. -