Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटाबंदीनंतर ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांमधील तब्बल ९.२१ लाख कोटी रुपये गायब

नोटाबंदीनंतर ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांमधील तब्बल ९.२१ लाख कोटी रुपये गायब

२०१९ पासून २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:54 AM2022-09-28T10:54:43+5:302022-09-28T10:55:15+5:30

२०१९ पासून २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे.

As much as Rs 9 21 lakh crore disappeared between Rs 500 and Rs 2000 notes after demonetisation black money | नोटाबंदीनंतर ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांमधील तब्बल ९.२१ लाख कोटी रुपये गायब

नोटाबंदीनंतर ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांमधील तब्बल ९.२१ लाख कोटी रुपये गायब

२०१६ च्या नोटाबंदीच्या वेळी, केंद्र सरकारला किमान ३-४ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र केवळ १.३ लाख कोटी रुपये बाहेर आले. नोटाबंदीनंतर ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांमधील तब्बल ९.२१ लाख कोटी रुपये गायब झाले असल्याची माहिती आरबीआयच्या नव्या अहवालात समोर आली आहे.

आरबीआयच्या २०१६-१७ ते २०२१-२२ च्या आतापर्यंतच्या अहवालांनुसार, आरबीआयने २०१६ पासून आतापर्यंत ५०० आणि २ हजारांच्या ६,८४९ कोटी रुपयांच्या नोटा छापल्या. त्यातील १,६८० कोटींपेक्षा अधिक नोटा चलनातून गायब आहेत. या गहाळ नोटांची किंमत ९.२१ लाख कोटी रुपये आहे. या हरवलेल्या नोटांमध्ये त्या नोटांचा समावेश नाही ज्या खराब झाल्यानंतर आरबीआयने नष्ट केल्या होत्या.

सरकारने छपाई का बंद केली? 
काळा पैसा जमा करण्यासाठी सर्वात जास्त ५०० ते २००० च्या नोटांचा वापर केला जातो. त्यामुळेच २०१९ पासून २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. मात्र २०१६ च्या तुलनेत ५०० रुपयांच्या नोटांची छपाई ७६ टक्क्यांनी वाढली आहे. स्वीस बँकेत भारतीयांचा काळा पैसा ३०० लाख कोटी आहे. ९ लाख कोटी रुपये म्हणजे ३ टक्के रक्कम देशातून गायब आहे.

छापलेल्या नोटा (आकडेवारी कोटींमध्ये) 
                  २०००च्या     ५००च्या

२०१६-१७     ३५०           ७२६ 
२०१७-१८     १५.१०         ९६९
२०१८-१९     ४.७०         ११४७ 
२०१९-२०     ००             १२०० 
२०२०-२१     ००             ११५७ 
२०२१-२२     ००             १२८० 
एकूण          ३७०          ६४७९ 

Web Title: As much as Rs 9 21 lakh crore disappeared between Rs 500 and Rs 2000 notes after demonetisation black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.