Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio Recharge Plan: ५जी येताच Jioने दिला ४जी ग्राहकांना धक्का, बंद केले हे १२ प्लॅन्स, मिळणार नाही ही ऑफर

Jio Recharge Plan: ५जी येताच Jioने दिला ४जी ग्राहकांना धक्का, बंद केले हे १२ प्लॅन्स, मिळणार नाही ही ऑफर

Jio Recharge Plan: ५जी सेवा येताच जियोने मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून एक दोन नाही तर १२ प्लॅन्स हटवले आहेत. हे सर्व प्लॅन्स Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसह मिळत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:38 PM2022-10-13T13:38:09+5:302022-10-13T13:38:58+5:30

Jio Recharge Plan: ५जी सेवा येताच जियोने मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून एक दोन नाही तर १२ प्लॅन्स हटवले आहेत. हे सर्व प्लॅन्स Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसह मिळत होते.

As soon as 5G came, Jio gave a shock to 4G customers, closed these 12 plans, this offer will not be available | Jio Recharge Plan: ५जी येताच Jioने दिला ४जी ग्राहकांना धक्का, बंद केले हे १२ प्लॅन्स, मिळणार नाही ही ऑफर

Jio Recharge Plan: ५जी येताच Jioने दिला ४जी ग्राहकांना धक्का, बंद केले हे १२ प्लॅन्स, मिळणार नाही ही ऑफर

मुंबई - ५जी सेवा येताच जियोने मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून एक दोन नाही तर १२ प्लॅन्स हटवले आहेत. हे सर्व प्लॅन्स Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसह मिळत होते. जियोने १५१ रुपयांपासून ते ३ हजार ११९ रुपयांपर्यंतचे प्लॅन्स हटवले आहेत. यामध्ये रेग्युलर रिचार्ज प्लॅन्ससह डेटा अॅडेड ऑन्सपर्यंतच्या प्लॅन्सचा समावेश आहे.

जियोच्या अनेक रिचार्ज प्लॅन्ससह ग्राहकांना एक वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइलचं सब्स्क्रिप्शन मिळतं. काही प्लॅन्समध्ये हे सब्स्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मिळतं. कंपनीने डझनभर प्लॅन्स डिस्कंटीन्यी केले असले तरी दोन प्लॅन्ससह अद्यापही Disney+ Hotstar चं सब्स्क्रिप्शन मिळत आहे. 
हे दोन्ही प्लॅन्स खूप महागडे आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये युझर्सना Disney+ Hotstar चं प्रीमियम सब्स्क्रिप्शन मिळतं. मात्र खालील काही प्लॅन्समधील Disney+ Hotstarचं सब्स्क्रिप्शन कंपनीने बंद केलं आहे. 

या प्लॅन्समधील Disney+ Hotstarचं सब्स्क्रिप्शन कंपनीने बंद केलं
१५१ रुपयांचा डेटा अॅड ऑन
५५५ रुपयांचा डेटा अॅड ऑन प्लॅन 
६५९ रुपयांचा डेटा अॅड ऑन प्लॅन
३३३ रुपयांचा डिस्नी प्लस हॉटस्टार रिचार्ज प्लॅन 
४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन 
५८३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन 
६०१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन 
७८३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन 
७९९ रुपयांचा प्लॅन
१०६६ रुपयांचा प्लॅन 
२९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
३११९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन  

Web Title: As soon as 5G came, Jio gave a shock to 4G customers, closed these 12 plans, this offer will not be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.