Join us  

Jio Recharge Plan: ५जी येताच Jioने दिला ४जी ग्राहकांना धक्का, बंद केले हे १२ प्लॅन्स, मिळणार नाही ही ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 1:38 PM

Jio Recharge Plan: ५जी सेवा येताच जियोने मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून एक दोन नाही तर १२ प्लॅन्स हटवले आहेत. हे सर्व प्लॅन्स Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसह मिळत होते.

मुंबई - ५जी सेवा येताच जियोने मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून एक दोन नाही तर १२ प्लॅन्स हटवले आहेत. हे सर्व प्लॅन्स Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसह मिळत होते. जियोने १५१ रुपयांपासून ते ३ हजार ११९ रुपयांपर्यंतचे प्लॅन्स हटवले आहेत. यामध्ये रेग्युलर रिचार्ज प्लॅन्ससह डेटा अॅडेड ऑन्सपर्यंतच्या प्लॅन्सचा समावेश आहे.

जियोच्या अनेक रिचार्ज प्लॅन्ससह ग्राहकांना एक वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइलचं सब्स्क्रिप्शन मिळतं. काही प्लॅन्समध्ये हे सब्स्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मिळतं. कंपनीने डझनभर प्लॅन्स डिस्कंटीन्यी केले असले तरी दोन प्लॅन्ससह अद्यापही Disney+ Hotstar चं सब्स्क्रिप्शन मिळत आहे. हे दोन्ही प्लॅन्स खूप महागडे आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये युझर्सना Disney+ Hotstar चं प्रीमियम सब्स्क्रिप्शन मिळतं. मात्र खालील काही प्लॅन्समधील Disney+ Hotstarचं सब्स्क्रिप्शन कंपनीने बंद केलं आहे. 

या प्लॅन्समधील Disney+ Hotstarचं सब्स्क्रिप्शन कंपनीने बंद केलं१५१ रुपयांचा डेटा अॅड ऑन५५५ रुपयांचा डेटा अॅड ऑन प्लॅन ६५९ रुपयांचा डेटा अॅड ऑन प्लॅन३३३ रुपयांचा डिस्नी प्लस हॉटस्टार रिचार्ज प्लॅन ४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ५८३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ६०१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ७८३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ७९९ रुपयांचा प्लॅन१०६६ रुपयांचा प्लॅन २९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन३११९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन  

टॅग्स :जिओमोबाइलव्यवसाय