भारताची लोकसंख्या 130 कोटींच्या जवळपास आहे आणि लोकांमध्ये iPhones खरेदीची इतकी क्रेझ आहे की, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days) सुरू होताच 21 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता अनेकांनी iPhone 13 विकत घेतला. महत्त्वाचं म्हणजे 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता, iPhone 13 फ्लिपकार्टवर 47990 च्या किमतीवर सूचीबद्ध झाला होता आणि अॅक्सिस अथवा आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड्सद्वारे पेमेंट केल्यास सुमारे 3000 रुपयांची सूट मिळत होती. त्यानंतर त्याची प्रभावी किंमत ₹ 45000 पर्यंत खाली आली. यावेळी, फ्लिपकार्ट जुन्या फोनच्या एक्सचेंजवर सुमारे 16000 रुपये देत होते, त्यानंतर तुम्हाला 29000 रुपयांमध्ये आयफोन 13 मिळाला असता.
थोड्याच वेळात, फ्लिपकार्टने iPhone 13 ची किंमत 49990 रूपयांपर्यंत वाढवली. काही तासांतच iPhone 13 ची किंमत 2000 रुपयांनी वाढली. यानंतर, 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी iPhone 13 ची किंमत 50,990 रुपये दिसली. जर आपण 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता पाहिलं तर iPhone 13 ची किंमत 51990 रुपये आणि काही वेळाने 53990 रूपये झाली. हा सेल 22 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता सामान्य ग्राहकांसाठी सुरू झाला तेव्हा, iPhone 13 ची किंमत 54990 रुपये दिसली, जी शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 56990 रुपये झाली.
कोणाला मिळाला फायदा?खरं तर, फ्लिपकार्टच्या प्लस मेंबर्ससाठी बिग बिलियन डेज सेल 24 तास अगोदर सुरू होतो. त्यानुसार 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता ही विक्री सुरू झाली होती. 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता क्रेडिट कार्ड आणि 47990 रूपयांवर कॅशबॅक यांसारख्या सवलती मिळाल्यानंतर स्वस्त दरात iPhone 13 खरेदी करण्याची वाट पाहत असलेल्या लोकांनी 44990 रुपयांमध्ये मध्ये iPhone 13 खरेदी केला.
किती रुपयांचा फरक?आता, जेव्हा Flipkart ची वेबसाइट सेलमध्ये iPhone 13 ची किंमत 56990 रुपये दाखवत आहे, तेव्हा कॅशबॅक आणि इतर सवलतींसह त्याची किंमत 53000 रुपये आहे. त्यानुसार, फ्लिपकार्टच्या प्लस सदस्याला विक्रीच्या पहिल्या पहिल्या दिवसातच 9000 रुपयांचा लाभ मिळाला आहे.