Lokmat Money > बिझनेस न्यूज > iPhone 15 लाँच होताच Apple ला बसला ४ लाख कोटींचा फटका, पाहा काय आहे कारण?

iPhone 15 लाँच होताच Apple ला बसला ४ लाख कोटींचा फटका, पाहा काय आहे कारण?

मंगळवारी अ‍ॅपलनं (Apple) आपली नवीन iPhone सीरीज 15 लाँच केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 03:35 PM2023-09-13T15:35:50+5:302023-09-13T15:37:12+5:30

मंगळवारी अ‍ॅपलनं (Apple) आपली नवीन iPhone सीरीज 15 लाँच केली.

As soon as iPhone 15 was launched Apple was hit by 4 lakh crores see what is the reason huawei shipment increased | iPhone 15 लाँच होताच Apple ला बसला ४ लाख कोटींचा फटका, पाहा काय आहे कारण?

iPhone 15 लाँच होताच Apple ला बसला ४ लाख कोटींचा फटका, पाहा काय आहे कारण?

मंगळवारी अ‍ॅपलनं (Apple) आपली नवीन iPhone सीरीज 15 लाँच केली. विशेष बाब म्हणजे लॉन्च झाल्यानंतर अॅपलच्या शेअर्समध्ये सुमारे दोन टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे कंपनीला तब्बल 47.76 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. भारतीय रुपयांत हे मूल्य जवळपास 4 कोटी रुपये इतकं आहे. दरम्यान, शेअर घसरण्याचं मुख्य कारण म्हणजे चीनी कंपनी हुवावे टेक्नॉनॉजीज (Huawei Technologies) आहे. त्यांनी त्यांच्या शिपमेंटमध्ये २० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. अलीकडे, अ‍ॅपलच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या चीनमधून कंपनीसाठी कोणतीही चांगली बातमी आलेली नाही. याच कारणामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये 5 दिवसांत 6 टक्क्यांहून

अधिक घसरण झाली आहे.
मंगळवारी अ‍ॅपलचे शेअर 1.76 टक्क्यांनी घसरून 176.30 डॉलर्स वर बंद झाले. ट्रेडिंगदरम्यान कंपनीचे शेअर्स 174.82 वर पोहोचले. कामकाजाच्या सुरुवातीला कंपनीचे शेअर्स 179.49 रुपयांवर उघडले. 

जर गेल्या 5 दिवसांबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मात्र, यंदा अ‍ॅपलच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. एक्सचेंज डेटानुसार, अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये आतापर्यंत 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते अॅपलच्या स्टॉकवर काही दिवस दबाव राहू शकतो.

मोठं नुकसान
कंपनीच्या शेअर्समधील घसरणीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात मोठी घसरण झाली. ही घसरण 47.76 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. भारतीय रुपयांमध्ये हे नुकसान सुमारे 4 लाख कोटी रुपयांचं आहे. एक्सचेंज डेटानुसार, सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 2.799 ट्रिलियन डॉलर्स होते, जे मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर 2.752 ट्रिलियन डॉलर्सवर आलं. याचा अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 47 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त घसरण झाली.

Web Title: As soon as iPhone 15 was launched Apple was hit by 4 lakh crores see what is the reason huawei shipment increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.