Lokmat Money > बिझनेस न्यूज > पितृपक्ष सुरू होताच, सोन्याची चमक उतरली; दोनच दिवसांत ८०० रुपयांनी घसरण

पितृपक्ष सुरू होताच, सोन्याची चमक उतरली; दोनच दिवसांत ८०० रुपयांनी घसरण

एकीकडे पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीच्या भावात घसरण होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 07:48 AM2023-10-01T07:48:04+5:302023-10-01T07:48:18+5:30

एकीकडे पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीच्या भावात घसरण होत आहे.

As soon as Pitrupaksha begins, the golden glow descends; 800 down in two days | पितृपक्ष सुरू होताच, सोन्याची चमक उतरली; दोनच दिवसांत ८०० रुपयांनी घसरण

पितृपक्ष सुरू होताच, सोन्याची चमक उतरली; दोनच दिवसांत ८०० रुपयांनी घसरण

जळगाव : एकीकडे पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीच्या भावात घसरण होत आहे. सध्या सोने ५८ हजार २०० रुपये प्रति तोळा असून चांदी ७२ हजार रुपये प्रति किलोवर आहे.

गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव कमी होत असून दोन दिवसात सोने ८०० रुपये प्रति तोळ्याने कमी झाले आहे. तसेच पाच दिवसांत चांदीचेही भाव एक हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहे. महिन्याभराच्या तुलनेत डॉलरचे दर ८३.१८ रुपये झाले, तरी तरीही सोने घसरण्यामागे सट्टाबाजार हे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे.

दिवाळीनंतर पुन्हा तेजी

दिवाळीपर्यंत त्यात आणखी घसरण होईल. सध्या आयातशुल्क कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. डॉलरचे दर वाढत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.

सोन्याचे दर (प्रतितोळा)

मार्च           ५९,५००

एप्रिल          ६०,०००

मे             ६०,२००

जून           ५८,१००

जुलै           ५९,५००

ऑगस्ट         ५९,४००

३० सप्टेंबर             ५८,२००

Web Title: As soon as Pitrupaksha begins, the golden glow descends; 800 down in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.