Join us  

पितृपक्ष सुरू होताच, सोन्याची चमक उतरली; दोनच दिवसांत ८०० रुपयांनी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 7:48 AM

एकीकडे पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीच्या भावात घसरण होत आहे.

जळगाव : एकीकडे पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीच्या भावात घसरण होत आहे. सध्या सोने ५८ हजार २०० रुपये प्रति तोळा असून चांदी ७२ हजार रुपये प्रति किलोवर आहे.

गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव कमी होत असून दोन दिवसात सोने ८०० रुपये प्रति तोळ्याने कमी झाले आहे. तसेच पाच दिवसांत चांदीचेही भाव एक हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहे. महिन्याभराच्या तुलनेत डॉलरचे दर ८३.१८ रुपये झाले, तरी तरीही सोने घसरण्यामागे सट्टाबाजार हे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे.

दिवाळीनंतर पुन्हा तेजी

दिवाळीपर्यंत त्यात आणखी घसरण होईल. सध्या आयातशुल्क कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. डॉलरचे दर वाढत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.

सोन्याचे दर (प्रतितोळा)

मार्च           ५९,५००

एप्रिल          ६०,०००

मे             ६०,२००

जून           ५८,१००

जुलै           ५९,५००

ऑगस्ट         ५९,४००

३० सप्टेंबर             ५८,२००

टॅग्स :सोनंचांदी