Lokmat Money > बिझनेस न्यूज > Elon Musk सोबत बदला! ट्विटरवरून ब्लू टिक जाताच ही व्यक्ती म्हणाली, आता Tesla कार खरेदीचा प्लॅन कॅन्सल!

Elon Musk सोबत बदला! ट्विटरवरून ब्लू टिक जाताच ही व्यक्ती म्हणाली, आता Tesla कार खरेदीचा प्लॅन कॅन्सल!

शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि टीव्ही रिअॅलिटी शोचे जज अनुपम मित्तल ब्लू टिक गायब झाल्याने प्रचंड नाराज झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 06:32 PM2023-04-25T18:32:05+5:302023-04-25T18:32:58+5:30

शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि टीव्ही रिअॅलिटी शोचे जज अनुपम मित्तल ब्लू टिक गायब झाल्याने प्रचंड नाराज झाले आहेत.

as soon as the blue tick on Twitter losing; shark tank judge anupam mittal said now cancel the plan to buy a Tesla car | Elon Musk सोबत बदला! ट्विटरवरून ब्लू टिक जाताच ही व्यक्ती म्हणाली, आता Tesla कार खरेदीचा प्लॅन कॅन्सल!

Elon Musk सोबत बदला! ट्विटरवरून ब्लू टिक जाताच ही व्यक्ती म्हणाली, आता Tesla कार खरेदीचा प्लॅन कॅन्सल!

गेल्या आठवडाभरापासून ट्विटरच्या ब्लू टिकवरून (Twitter Blue Tick) सोशल मिडियावर बरीच चर्चा सुरू आहे. कारण ट्विटरने व्हेरिफाइड ब्लू टिक आता पेड केले आहे. अर्थात अता ज्या लोकांच्या ट्विटर अकाउंटला ब्लू टिक आहे, त्यांनी त्यासाठी जवळपास 900 रुपये पे केले आहेत. भारतातील अनेक दिग्गजांच्या ट्विटर हँडलवरून ब्ल्यू बॅज गायब झाले आहे. शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि टीव्ही रिअॅलिटी शोचे जज अनुपम मित्तल ब्लू टिक गायब झाल्याने प्रचंड नाराज झाले आहेत. इलॉन मस्क यांच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या मित्तल यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

टेस्ला कार खरेदी करणार नाही - 
ट्विटर हँडलवरून ब्लू बॅज गायब झाल्यानंतर, अनुपम मित्तल यांनी ट्विट केले आहे की, 'मी माझा टेस्ला कार खरेदीचा प्लॅन कॅन्स करत आहे.' इलॉन मस्क यांनी ट्विटरचे (Twitter) अधिग्रहण केल्यापासूनच, ब्लू टिकच्या सब्सक्रिप्शन सर्व्हिससंदर्भात काम करायला सुरुवात केली होती. महत्वाचे म्हणजे ट्विटर गेल्या अनेक दिवसांपासून घाट्यात सुरू आहे. यानंतर, मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर, त्याला प्रॉफिटेबल बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्लू टिकसाठी द्यावे लागणार पैसे -
इलॉन मस्क यांनी लिगसी खात्यातून ब्लू टिक रिमुव्ह करून सबस्क्रिप्शनमध्ये जोडण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून कंपनीचा महसूल वाढेल. यामुळे, सर्व अकाउंटवरून ब्लू टिक काढण्यात आले. यामुळे आता आपल्याला प्रत्येकाच्या ट्विटर हँडलवर ब्लू सबस्क्रिप्शनचा पर्याय दिसत असेल. 

यावर क्लिक करून आपण ब्लू टिक खरेदी करू शकता. याची मंथली सब्सक्रिप्शन 650 रुपये आहे. तर एका वर्षासाठीचा प्लॅन 6,800 रुपयांचा आहे. ही किंमत वेब व्हर्जनची आहे. मोबाईल व्हर्जनसाठी आपल्याला महिन्याला 900 रुपये, तर वर्षाला 9,400 रुपये खर्च करावे लागतील.

 

Web Title: as soon as the blue tick on Twitter losing; shark tank judge anupam mittal said now cancel the plan to buy a Tesla car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.