Join us  

सरकार स्थापन होताच शेअर बाजारात चढ-उतार थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 9:05 AM

येत्या काही दिवसांत बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर हा गोंधळ थांबेल व बाजाराला पुन्हा गती मिळू शकते. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. निकालानंतर शेअर बाजारात इतिहासातील सर्वांत मोठी घसरण झाली. द्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे, मात्र हे सरकार मित्रपक्षांच्या पाठिंब्याने एनडीए आघाडीचे असणार आहे. येत्या काही दिवसांत बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर हा गोंधळ थांबेल व बाजाराला पुन्हा गती मिळू शकते. 

बाजाराचे लक्ष बजेटवरब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने अहवालात म्हटले आहे की, बाजाराचा मुख्य कल हा गोंधळ कमी झाल्यानंतर पुढील काही दिवसांत तेजी परत येऊ शकते. नवीन सरकार काही आठवड्यांमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. यात भांडवली खर्च, उत्पादन, ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांवर लक्ष दिले जाईल. 

उद्योजकांची अपेक्षा काय?नवीन सरकारने आर्थिक सुधारणा सुरू ठेवल्या पाहिजेत आणि धोरणात सातत्य राखावे, अशी भारतीय कंपन्यांच्या सीईओंची अपेक्षा आहे. नव्या सरकारने पीएलआय योजनाही सुरू ठेवाव्यात, असे ते म्हणाले.गोदरेज इंडस्ट्रीजचे चेअरमन नादिर गोदरेज म्हणाले की, एक्झिट पोल अगदी चुकीचे असल्याचे दिसून आले. या निकालांचा उद्योगावर परिणाम होणार नाही.ॲनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, रिअल इस्टेट उद्योग नेहमीच स्थिर सरकारची वाट पाहत असतो जे चालू योजना व पायाभूत सुविधांच्या योजनांमध्ये अडथळा येणार नाही, याची खात्री करेल.

विमा उद्योगाला काय हवे?विमा क्षेत्राशी निगडीत जाणकारांच्या मते कोणतीही आघाडी सत्तेवर आली तरी त्याचा विमा व्यवसायाच्या वाढीवर परिणाम होणार नाही. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालक विभा पडळकर म्हणाल्या, विमा नियामकाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही २०४७ पर्यंत ‘सर्वांसाठी विमा’ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

टॅग्स :शेअर बाजारलोकसभा निवडणूक २०२४ निकाल