Ashneer Grover : 'भारतपे'चे को फाऊंडर (BharatPe Co-Founder) आणि माजी मॅनेजिंग डायरेक्टर अशनीर ग्रोव्हर यांनी (Ashneer Grover) यांनी घरातील डायनिंग टेबलवर कोट्यवधींचा खर्च केल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. डायनिंग टेबलवर इतकी रक्कम खर्च करण्यापेक्षा आपण बिझनेस किंवा नोकऱ्या निर्माण करण्यासाठी ही रक्कम खर्च करू असं ते वृत्ताचं खंडन करताना म्हणाले.
"हे काही स्पेस रॉकेट आहे का?, की हे टाईम मशीन आहे?, नाही हे दहा कोटींचं डायनिंग टेबल आहे. सर्वात महागडं डायनिंग टेबल वापरण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावे नाही. ना मला असं काही करायचंय. माध्यमांनो भारतपे च्या खोट्या गोष्टींवर विश्वास करू नका, त्यांच्याप्रमाणे तुम्हीही आपली विश्वासार्हता गमवाल," असं अशनीर ग्रोव्हर म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं स्पष्टीकरण दिलं.
Is it a space rocket? Is it a time machine? No it’s a ₹10cr dining table !! Haha ! I don’t hold the Guinness World Record for most expensive table ever. Nor do I intend to. Press - don’t fall for BharatPe Board (undisclosed sources) lies - you’ll lose your credibility like them. pic.twitter.com/kdONGiMN0Z
— Ashneer Grover (@Ashneer_Grover) March 13, 2022
It’s not even worth 0.5% of that. I’d rather put ₹10cr in business and create employment for 1,000 of folks so that they can earn & put dignified meal on their tables for their families. Score; Self Goal (Loss of Credibility) by BharatPe Board / Investors - 1 : Lavishness - 0.— Ashneer Grover (@Ashneer_Grover) March 13, 2022
"... त्यापेक्षा नोकऱ्या निर्माण करेन"
अशनीर ग्रोव्हर यांनीएक डायनिंग टेबल खरेदी करण्यासाठी १ लाख ३० हजार डॉलर्स खर्च केल्याचं काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्गनं म्हटलं होतं. या डायनिंग टेबलची किंमत त्याच्या ०.५ टक्केही नसल्याचं अशनीर ग्रोव्हर म्हणाले. "हे टेबल त्याच्या ०.५ टक्केही नाही. असं करण्याऐवजी मी १० कोटींचा व्यवसाय करेन आणि १ हजार लोकांसाठी नोकऱ्या निर्माण करेन. जेणेकरून ते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरी सन्मानानं जेवण मिळेल," असंही ते म्हणाले.