Ashneer Grover News: फिनटेक कंपनी 'भारतपे'चे (BharatPe) माजी सह संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. 'भारतपे'च्या खराब आर्थिक कामगिरीबद्दल त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांवर हल्लाबोल केला आणि 'अब नानी याद आएगी' असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
अशनीर ग्रोव्हर यांनी ट्वीट करून बोर्डाचे अध्यक्ष रजनीश कुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुहेल समीर यांना लक्ष्य केलं. "मी असं ऐकलं की भारतपे इंडिया रजनीश कुमार आणि सुहेल समीर यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या तिमाहित 'डिग्रोथ' आणि 'मॅक्सिमम कॅश बर्न' अशी कामगिरी झाली आहे. चावी हिसकावणं आणि दुकान चालवणं या दोन्ही निराळ्या गोष्टी आहेत. बाजार ही अंतिम चाचणी आणि सत्य आहे," असं अशनीर ग्रोव्हर म्हणाले.
So I just heard @bharatpeindia closed it’s first quarter of ‘degrowth’ and ‘maximum cash burn’ under able (sic) leadership of Rajnish Kumar and Suhail Sameer. ‘Chaabi chheenna and hatti chalana do alag alag skills hai !’ Ab Nani yaad aayegi - markets are the ultimate test & truth
— Ashneer Grover (@Ashneer_Grover) April 7, 2022
दाखवला बाहेरचा रस्ता
दरम्यान, अशनीर ग्रोव्हर यांची पत्नी माधुरी जैन यांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली कंपनीनं काढून टाकलं होतं. त्यानंतर अशनीर ग्रोव्हर यांनीदेखील राजीनामा दिला होता. परंतु त्यानंतर कंपनीनं त्यांनाही सह-संस्थापक आणि अन्य पदांवरुन हटवलं होतं. तसंच अशनीर ग्रोव्हर आणि अन्य सदस्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा अधिकार असल्याचंही कंपनीनं म्हटलं होतं. सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांचे कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा आरोप भारतपेकडून करण्यात आला होता.