भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांना गुरुवारी जारी केलेल्या एलओसीच्या (लूक आउट सर्कुलर) आधारे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आलं. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघं न्यूयॉर्कसाठी रवाना होत होतं. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) विनंतीवरून दोघांविरुद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. जूनच्या सुरुवातीला, आर्थिक गुन्हे शाखेनं या जोडप्याविरुद्ध आणि कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध निधीचा गैरव्यवहार केल्याबद्दल आणि भारतपे संचालित करणार्या रेझिलिएंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडला ८१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल एफआयआर दाखल केला होता. ज्या व्यक्तीविरुद्ध एलओसी जारी करण्यात आली आहे, तो देशाबाहेर प्रवास करू शकत नाही.
अशनीर ग्रोव्हर, त्यांच्या पत्नीला पोलिसांनी विमानतळावर थांबवलं; न्यू यॉर्कला जाऊ दिलं नाही, कारण काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 2:51 PM