मुंबई : जागतिक विकासात ७५ टक्के वाटा आशियातील देशांचा आहे. तसे असताना आशियातील ११ टक्के नागरिक ‘गरीब’ श्रेणीत आहेत, अशी खंत मूळ चीनचे असलेले ‘एआयआयबी’चे अध्यक्ष जीन लिक्यून यांनी व्यक्त केली. आशिया इन्फ्राक्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) वार्षिक परिषदेचा समारोप मंगळवारी झाली. त्या वेळी लिक्यून यांनी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले की, एकविसावे शतक आशियाचे असेल. आशियाई देश जगावर वर्चस्व गाजवतील, पण यासाठी येथील नागरिकांचे जीवनमान बदलण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाखेरीज ते शक्य नाही. यासाठी आशियातील पायाभूत सुविधा क्षेत्रात २०३० पर्यंत दरवर्षी २ लाख कोटींची गुंतवणूक होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने बँकेच्या प्रशासकीय व संचालक मंडळाने या परिषदेत चर्चा केली. ‘एआयआयबी’मध्ये आतापर्यंत ८६ देश होते. मुंबईतील या बैठकीत लेबनॉन या ८७व्या देशाला सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. एआयआयबी ही आशियासाठीची बँक असतानाही सदस्य बाहेरील का? या प्रश्नाच्या उत्तरात लिक्यून म्हणाले, बँक आशियातील पायाभूत सुविधा विकासासाठीच स्थापन झाली आहे, पण जगाच्या अन्य भागाशी संबंध तोडून आशियाला स्वबळावर उभा राहता येणार नाही. बँकेचे ७५ टक्के भागधारक आशियातील व २५ टक्के आशियाबाहेरील आहेत. भारत यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भागीदार आहे.
आशियामध्ये ११% जनता गरीब
जागतिक विकासात ७५ टक्के वाटा आशियातील देशांचा आहे. तसे असताना आशियातील ११ टक्के नागरिक ‘गरीब’ श्रेणीत आहेत, अशी खंत मूळ चीनचे असलेले ‘एआयआयबी’चे अध्यक्ष जीन लिक्यून यांनी व्यक्त केली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:52 AM2018-06-27T05:52:29+5:302018-06-27T05:52:53+5:30