Join us

परदेशातून येणारा पैसा मोठ्या प्रमाणात घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:24 PM

आशिया-प्रशांत क्षेत्राला फटका

नवी दिल्ली : कोविड-१९च्या साथीमुळे आशिया -प्रशांत क्षेत्रातील देशांमध्ये परदेशांमधून मनिआॅर्डरद्वारे येणाऱ्या पैशामध्ये मोठी कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे या देशांना वार्षिक ५३.४ अब्ज डॉलरपर्यंत फटका बसण्याची शक्यता आहे.आशियाई विकास बॅँकेने या संदर्भात एक अहवाल प्रकाशित केला असून, त्यामध्ये वरील शक्यता व्यक्त केली आहे. या क्षेत्रांमधील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा हा अन्य देशांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी गेलेल्यांकडून पाठविला जातो. कोविडच्या साथीमुळे जगभरातील नोकºया मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. तसेच पगारामध्येही कपात होत असल्याने आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये मनिआॅर्डरच्या माध्यमातून येणारा पैसा मोठ्या प्रमाणात घटणार आहे. वर्षाला ३१.४ ते ५४.३ अब्ज डॉलरपर्यंत हा पैसा कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसू शकतो.एकतृतीयांश वाटाअन्य देशांमध्ये जाऊन नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्यांपैकी ३३ टक्के वाटा हा आशिया-प्रशांत देशांमधील नागरिकांचा असतो. या व्यक्ती आपल्या कमाईमधील काही रक्कम ही आपल्या घरी मनिआॅर्डरच्या माध्यमातन पाठवित असतात. या पैशांवरच त्यांच्या घरच्यांची गुजराण होत असते.