Join us

एशियन पेंट्स ट्रॅक्टर स्पार्क आणि एस स्पार्क इमल्शनसह तुमचं घर करा अपग्रेड : बजेट में फिट, शौक की नो लिमिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 12:27 PM

आपल्या घरासाठी योग्य पेन्ट निवडणं हे तुम्हाला एक आव्हानात्मक काम वाटत असेल.

आपल्या घरासाठी योग्य पेन्ट निवडणं हे तुम्हाला एक आव्हानात्मक काम वाटत असेल. पेन्टसाठी तुमच्याकडे अनेक पर्याय असले तरी त्याच्या निवडीच्या वेळी त्याची किंमत हा महत्त्वाचा घटक आणि केंद्रबिंदू ठरतो. अशा परिस्थितीत एशियन पेन्ट्स ट्रॅक्टर स्पार्क आणि एस स्पार्क इमल्शनची निवड करणं हुशारीचं ठरेल. एशियन पेन्ट्स तुमचं बजेट आणि तुमच्या गरजा लक्षात घेऊन, तुमचं घर किंवा व्यावसायिक जागांसाठी इंटिरिअर पेन्ट्सची विस्तृत श्रेणी ऑफर करते. परवडणाऱ्या किंमतीत उत्कृष्ट फिनिशिंग हे याचं वैशिष्ट्य आहे. महागडं आणि उच्च दर्जाचं इमल्शन पेन्टने तुमच्या घराला जी शान येते, त्याच दर्जाचं फिनिशिंग एशियन पेन्ट्स ट्रॅक्टर आणि स्पार्क इमल्शन अंतर्गत आणि बाह्य भिंतींना देतात. 

हे पेन्ट केवळ बजेट-फ्रेंडलीच नाही तर ते घरमालकांना दुहेरी आनंद देणारं आहे. कारण, यात झालेल्या बचतीतून ग्राहक आणखी काही खरेदी करू शकतात, त्यांच्या इतर इच्छा पूर्ण करू शकतात. डिस्टेम्पर्सपासून स्मार्ट अपग्रेड करण्यासाठी हे एक परिपूर्ण उत्पादन असून यात गुणवत्तेशी अजिबात तडजोड केली जात नाही आणि हे पेन्ट आपल्या घराची शोभाही वाढवतं याची खात्री आहे. ब्रँडचा प्रचार करण्यासाठी एशियन पेंट्सनं 'बजेट में फिट, शौक की नो लिमिट' कॅम्पेन सुरु केली आहे.

नव्या पेन्टच्या माध्यमातून केलेली बचत आणि त्यातून आपल्या अन्य गरजा पूर्ण करणाऱ्या एका सहकाऱ्याची कथा या कॅम्पेनद्वारे सांगण्यात आली आहे. यात आपल्या ठरलेल्या बजेटमध्ये एक उत्तम दर्जाचं पेन्ट शोधण्यासाठी हे पेंट्स आदर्श पर्याय असल्याचं दाखवण्यात आलं. ब्रँडनं एक मजेशीर, स्नॅपी जिंगल देखील तयार केलं आहे जे ग्राहकांच्या मनात कायम राहू शकतं. "ग्राहकांना स्मार्ट, मौल्यवान ऑफर देण्याच्या आणि घराच्या सजावटीला खऱ्या अर्थानं उत्तम लूक मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाजारपेठेत आम्ही आमच्या ग्राहकांना समाधान देणारे नवे उत्तम पर्याय आम्ही कायमच लाँच करत असतो. हा ग्राहक उत्तम गुणवत्तेसह ब्रँडेड सोल्यूशन्समध्ये अपग्रेड करण्यास इच्छुक आहे. Tractor Sparc and Ace Sparc emulsions कसं आणि किती किफायतशीर आहे, हे नव्या कॅम्पेनद्वारे ग्राहकांना मनोरंजनाच्या माध्यमातून पटवून देता येईल", अशी प्रतिक्रिया एशियन पेन्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी Amit Syngle यांनी दिली.

टॅग्स :व्यवसाय