सध्या आपण घामाच्या धारांनी हैराण झालो आहोत. 'हिट व्हेव'मुळे उन्हाळा असह्य झालाय. थोडा गारवा हवाहवासा वाटतोय. पण, गार वाऱ्याची मंद झुळूक घेऊन येणाऱ्या रिमझिम सरी बरसायला अजून अवकाश आहे. दरवर्षी पावसाचे थेंब उन्हाच्या झळांपासून आपली सुटका करतात. मातीचा गंध, झाडांवरची हिरवळ प्रसन्नतेची अनुभूती देते. म्हणूनच, हा पावसाळा एक सोहळा असतो. पण, या सोहळ्याची तयारी वेळेवर केली नाही, तर आनंदावर विरजण पडू शकतं. कारण, आपलं घर आणि कपडे कोरडे आणि स्वच्छ असतील, तरच पावसाळा सुखावह होतो. नाहीतर, भिंतीतून झिरपणारं, दिवसभर छतातून टपकत राहणारं पाणी आपल्या तोंडचं पाणी पळवू शकतं. तसं काही व्हायला नको, यासाठी आपल्या घराचं, भिंतींचं वॉटरप्रूफिंग करून घेणं हाच मार्ग आहे आणि त्यासाठी हीच अत्यंत योग्य वेळ आहे.
भारतातील काही राज्यांमध्ये तुफान पाऊस पडतो. गेल्या दोन-चार वर्षांचा अनुभव पाहिला, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. जेव्हा, दोन-दोन दिवस पाऊस पडत असतो, तेव्हा टेरेसवर पाणी साचून राहतं. पूर परिस्थिती निर्माण झाली, तर घरातही पाणी शिरतं. हे पाणी भिंतींमध्ये झिरपतं, साचून राहतं. त्याचे दीर्घकालीन परिणाम गंभीर ठरू शकतात. घराची जी मूळ संरचना लोखंडी रॉडने केलेली असते त्यांना गंज चढतो आणि घराचं-इमारतीचं आयुष्य कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये घरात होणारी गळती रोखायची असेल, तर छताला वॉटरप्रूफिंग करून तुम्ही पावसाळ्यातील या समस्यांपासून तुमच्या घराचे संरक्षण करू शकता आणि तुमच्या घराची संरचना अधिक मजबूत व दीर्घकाळ टिकवली जाऊ शकते. हा विचार करून एशियन पेन्ट्सनं एक अत्यंत प्रभावी उत्पादन तयार केलं आहे. ते म्हणजे, Asian Paints SmartCare Damp Proof.
वॉटरप्रूफिंग सोल्यूशन घराला पाऊस आणि उष्णतेपासून वाचवते!
गेल्या काही वर्षांचा पावसाळा पाहता निसर्गाचा अंदाज लावणे खूपच कठीण आहे. कधी कधी वेळेच्या आधीच पावसाळा येतो, तर पावसाची वाट पाहताना ऊन चाळीशी पार करते. अशा वेळी घरात राहणार्यांसाठी घराची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडणं फारसं अवघड काम नाही. घराच्या छताचे आणि बाहेरील भिंतींचे वॉटरप्रूफिंग हा त्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हे तुमच्या घराला ३६० डिग्री संरक्षण देते. याशिवाय घराच्या छताला आणि बाहेरील भिंतींना वॉटरप्रूफिंग करण्याचे इतरही फायदे असतात. वॉटरप्रूफिंगमुळे तुमच्या छताचे आणि घराचे आयुष्य वाढते. घराची संरचना आणि पाया याचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते. तसेच, घराचे सौंदर्यही दीर्घकाळ टिकून राहते.
वॉटरप्रूफिंगचे व्यावसायिक फायदे देखील आहेत. तुमच्या घराच्या वॉटरप्रूफिंगमुळे तुमच्या खिशावर जास्त भार पडत नाही. तुमच्या घराचे सौंदर्य टिकवून ठेवल्याने तुमच्या घराची किंमत फार कमी होत नाही. ३६० डिग्री वॉटरप्रूफिंगसाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यासाठी तुम्ही Asian Paints वर अवलंबून राहू शकता, कारण ती या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आहेत. तुमच्या भिंती, छत आणि बाहेरील भिंती वर्षभर सुरक्षित करण्यासाठी ते घेऊन आलेत, Asian Paints SmartCare Damp Proof. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणतेही उत्पादन निवडू शकता. कारण हे १ लीटरच्या छोट्या पॅकपासून ते २० लीटरच्या मोठ्या पॅकपर्यंत मिळतं. बाकी तुमच्या वॉटरप्रुफिंगबाबतच्या गोष्टी तज्ज्ञांच्या मदतीने नीट हाताळल्या जातील यात वादच नाही.
- एशियन पेंट्स स्मार्टकेअर डॅम्प प्रूफ (8 वर्षांची वॉरंटी | 10 अंश पृष्ठभागाचे तापमान कमी)
वॉटरप्रूफिंग हे केवळ पावसाच्या संरक्षणासाठी नाही तर ते घराच्या पृष्ठभागाचे अतिउष्णतेपासून संरक्षण करते. तुमच्या घराचे छत हे थेट सूर्यप्रकाशाचा सामना करत असते. उन्हाळ्याच्या हंगामात थेट सूर्यप्रकाश टेरेस आणि बाल्कनीवर पडतो. अतिउष्णतेमुळे घराच्या छताला भेगा पडू शकतात, त्यामुळे भविष्यात घरात पाणी शिरण्याचीही शक्यता असते. अशा परिस्थितीत छप्पर, बाल्कनी आणि भितींचे वॉटरप्रूफिंग हेच या सर्व समस्यांचे निराकरण आहे.