Lokmat Money > बिझनेस न्यूज > तवसाळला होणार आशियातील सर्वांत मोठी रिफायनरी

तवसाळला होणार आशियातील सर्वांत मोठी रिफायनरी

गुहागर तालुक्यात तवसाळ येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल अशा तीन कंपन्यांचा एकत्रित आशिया खंडातील सर्वांत मोठा, साठ दशलक्ष टन

By admin | Published: October 25, 2015 10:32 PM2015-10-25T22:32:26+5:302015-10-25T22:32:26+5:30

गुहागर तालुक्यात तवसाळ येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल अशा तीन कंपन्यांचा एकत्रित आशिया खंडातील सर्वांत मोठा, साठ दशलक्ष टन

Asia's Largest Refinery | तवसाळला होणार आशियातील सर्वांत मोठी रिफायनरी

तवसाळला होणार आशियातील सर्वांत मोठी रिफायनरी

शृंगारतळी : गुहागर तालुक्यात तवसाळ येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल अशा तीन कंपन्यांचा एकत्रित आशिया खंडातील सर्वांत मोठा, साठ दशलक्ष टन क्षमतेचा तेलशुध्दीकरण प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, यासाठी मंत्रालयाची तत्वत: मान्यता मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी पाटपन्हाळे येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या देशात जामनगर येथे ४८ मिलियन टनचा रिलायन्स कंपनीचा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. यापेक्षा मोठा प्रकल्प गुहागर तालुक्यात होणार आहे. त्यासाठी सध्या शासनाच्या ताब्यात असलेल्या जागेपेक्षा अधिक जागा लागणार आहे. मात्र, लोकांच्या मर्जीने ती संपादन होणार आहे, असे गीते म्हणाले. पूर्वी आपण हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीला प्रकल्पासाठी जागा दिली होती. मात्र, त्यावेळी पश्चिम घाट संरक्षण क्षेत्र असल्याने मॉरिटोरियम लागले होते. त्यामुळे या प्रकल्पाला परवानगी मिळत नव्हती. अखेर तो प्रकल्प राजस्थानला गेल्याचे गीते म्हणाले.

Web Title: Asia's Largest Refinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.