गेल्या जानेवारीच्या मध्याला मुकेश अंबानी कुटुंबीयांची एकत्रित संपत्ती होती (तब्बल) १०२ अब्ज २० कोटी अमेरिकन डॉलर्स. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या गणिताने अंबानी हे आशियातले सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. या यादीतले दुसरे कुटुंब आहे इंडोनेशियाचे हार्तोनो. या कुटुंबाची संपत्ती अंबानी कुटुंबीयांच्या संपत्तीपेक्षा निम्म्याहूनही कमी आहे, यावरून अंबानी कुटुंबाच्या वर्चस्वाची कल्पना यावी.
(१९ जानेवारी २०२४ रोजी संपत्ती : आकडे अब्ज अमेरिकन डॉलर्समध्ये)
अंबानी, मिस्त्री, जिंदाल आणि बिर्ला
पहिल्या दहात चार भारतीय !
अंबानी १०२.७
हार्तोनो ४४.८
मिस्त्री ३६.२
क्वोक ३२.३
चेरावनोंत ३१.२
युविद्या ३०.२
जिंदाल २७.६
साई २४.०
चेंग २४.०
बिर्ला २१.८
(फक्त पिढीजात श्रीमंत कुटुंबांची यादी.. नवश्रीमंत कुटुंबांचा समावेश नाही.)