Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजच तुमच्या एचआरला विचारा सॅलरी स्ट्रक्चरबाबत हे दोन प्रश्न, वाचतील टॅक्सचे हजारो रुपये

आजच तुमच्या एचआरला विचारा सॅलरी स्ट्रक्चरबाबत हे दोन प्रश्न, वाचतील टॅक्सचे हजारो रुपये

Income Tax: सरकारकडून आकारला जाणारा प्राप्तीकर भरणं ही नागरिकांची जबाबदारी असते. कारण हा कर महसुलाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 12:25 AM2023-08-12T00:25:56+5:302023-08-12T00:26:34+5:30

Income Tax: सरकारकडून आकारला जाणारा प्राप्तीकर भरणं ही नागरिकांची जबाबदारी असते. कारण हा कर महसुलाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात.

Ask your HR today these two questions regarding salary structure, save thousands of rupees in tax | आजच तुमच्या एचआरला विचारा सॅलरी स्ट्रक्चरबाबत हे दोन प्रश्न, वाचतील टॅक्सचे हजारो रुपये

आजच तुमच्या एचआरला विचारा सॅलरी स्ट्रक्चरबाबत हे दोन प्रश्न, वाचतील टॅक्सचे हजारो रुपये

सरकारकडून आकारला जाणारा प्राप्तीकर भरणं ही नागरिकांची जबाबदारी असते. कारण हा कर महसुलाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात. प्राप्तिकर विभाग पगारदार लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीमधून करामध्ये सवलत उपलब्ध करून देतो. 
एका पगारदार व्यक्तीच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये अनेक अशा गोष्टी असतात. ज्यावरून कर किती कापला जाईल हे ठरतं. सॅलरी स्ट्रक्चरमधील या बदलांमुळे एकच सीटीसी असलेल्या दोन व्यक्तींना वेगवेगळा इन्कम टॅक्स द्यावा लागू शकतो. त्यामुळे याबाबतचे काही प्रश्न असतील तर ते एसआरला अवश्य विचारा. 

पहिला प्रश्न - सॅलरी स्ट्रक्चरमध्ये रीइम्बर्समेंट अॅड केलं जाऊ शकत? 
जर तुमच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये रीइम्बर्समेंटचा पर्याय नसेल, तर तुम्हाला तुमची इनहँड सॅलरी पूर्ण मिळेल. तसेच तीच तुमची ग्रॉस टॅक्सेबल सॅलरी असेल. तसेच जर रीइम्बर्समेंटचा पर्याय असेल तर तुमच्या पगारातील एक भाग तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा त्यासाठी बिल लावून तुम्ही रीइम्बर्समेंट लावाल. अशा प्रकरणात पगाराचा जो भाग तुम्हाला रीइम्बर्समेंट क्लेम केल्यावर मिळतो, तो ग्रॉस टॅक्सेबल सॅलरीमधून मायनस होईल.

समजा तुमचा वार्षिक इन हँड पगार ९ लाख रुपये असेल, कर तुमचा ग्रॉस टॅक्सेबल इन्कम हा ९ लाख होईल. तर जर तुम्ही महिन्याला १५ हजार म्हणजेच १.८० लाख रुपये रीइम्बर्समेंटमध्ये ठेवले तर तुमचं ग्रॉस टॅक्सेबल इन्कम हे ७ लाख २० हजार रुपये होईल.

दुसरा प्रश्न - तुमची कंपनी एनपीएस मध्ये कॉन्ट्रिब्युट करणार आहे का? 
एनपीएसचा प्लॅन तुम्ही स्वत:ही घेऊ शकता, पण जर तुमच्या कंपनीच्या पगाराचा स्ट्रक्चर हा एनपीएस कॉन्ट्रिब्युशनची सुविधा देत असेल तर त्या कॉन्ट्रिब्युशनमध्येही तुम्हाला करातून सवलत मिळू शकते. वैयक्तिकपणे एनपीएस घेतल्यावर जुन्या करप्रणालीनुसार तुम्हाला ८० सी अंतर्गत करामध्ये सवलत मिळते. सर्व मिळून ८० सी अंतर्गत केवळ दीड लाखांपर्यंतच्या रकमेवर कर सवलत मिळवता येऊ शकते. पण जर तुम्ही एक कर्मचारी म्हणून एनपीएस घेतली असेल तर तुमचा पगार आणि DA च्या १० टक्क्यांपर्यंतचं कॉन्ट्रिब्युशन  ८० सीसीडी (१) अंतर्गत टॅक्स फ्री होईल. त्याबरोबरच ८०सीसीडी (१बी) अंतर्गत ५० हजारांपर्यंत कर सवलत वेगळ्याने मिळवू शकता.

सॅलरी स्ट्रक्चरमध्ये रीइम्बर्समेंट आणि एनपीएस कॉन्ट्रिब्युशन जोडून तुम्ही तुमच्या कराच्या लायब्लिटीमध्ये काही हजार रुपयांपर्यंत कपात करू शकता. अनेक प्रकरणांमध्ये तुम्ही तुमची टॅक्स लायब्लिटी शून्यापर्यंत आणू शकता.  

Web Title: Ask your HR today these two questions regarding salary structure, save thousands of rupees in tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.