Lokmat Money > बिझनेस न्यूज > म्युच्युअल फंडांमधील मालमत्ता २५ ट्रिलियन

म्युच्युअल फंडांमधील मालमत्ता २५ ट्रिलियन

भारतामधील परस्पर निधींच्या (म्युच्युअल फंड) एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट) २५ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:14 AM2018-09-10T01:14:38+5:302018-09-10T01:14:40+5:30

भारतामधील परस्पर निधींच्या (म्युच्युअल फंड) एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट) २५ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे.

Assets in mutual funds 25 trillion | म्युच्युअल फंडांमधील मालमत्ता २५ ट्रिलियन

म्युच्युअल फंडांमधील मालमत्ता २५ ट्रिलियन

भारतामधील परस्पर निधींच्या (म्युच्युअल फंड) एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट) २५ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे. खासगी क्षेत्राला या क्षेत्रात संधी दिली गेली, त्याला २५ वर्षे होत असतानाच ही कामगिरी झाली आहे. आॅगस्ट अखेर परस्पर निधींकडील मालमत्ता २५.२ ट्रिलियन रुपये एवढी झाली आहे. वर्षभरामध्ये यामध्ये ४.६ ट्रिलियन रुपयांनी वाढ झाली आहे. पुढील २५ ट्रिलियन रुपयांचा टप्पा पाच वर्षांमध्ये पार करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
आॅगस्ट महिन्यामध्ये परस्पर निधींकडील मालमत्तेमध्ये ९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टॅक्स सेव्हिंग्जसह सर्व इक्विटी योजनांमध्ये आॅगस्ट महिन्यात ८३ अब्ज रुपयांची गुंतवणूक झाली. जुलै महिन्यापेक्षा ती ११ टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक चांगली आहे.

Web Title: Assets in mutual funds 25 trillion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.