अनेकदा कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा की आहे तेच सुरू ठेवावं याचा निर्णय घेण्यात आपल्याला समस्या निर्माण होत असते. प्राची पटवर्धन यांनी एक मोठा निर्णय घेत फ्लिपकार्टवरून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. १० वर्षं आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर आपला 'वर्क बॅलन्स' सांभाळण्यात असमर्थता निर्माण होत असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यांनी आपला वेगळा करिअर ऑप्शन निवडण्याचा निर्णय घेतला आणि यात त्यांची मदत केली ती म्हणजे त्यांचे पती. त्यांच्या पतीनं त्यांना फ्लिपकार्टद्वारे आर्टिफिशिअल ज्वेलरीच्या विक्रीचा पर्याय सुचवला. या पर्यायानुसार त्यांनी या व्यवसायाला सुरूवात केली, परंतु सुरुवातीच्या दिवसांत प्राची यांना काही समस्यांना समोरं जावं लागलं.
अनेक आर्टिफिशिअल ज्वेलरी विक्रेते हे ज्वेलरीच्या गुणवत्तेपेक्षा ते दागिने किती परवडणारे आहेत, याचा अधिक विचार करत असल्याचं सुरुवातीच्या काळात त्यांना लक्षात आलं. दुसरं म्हणजे, त्यांना काळाच्या कसोटीवर टिकेल असं मजबूत बिझनेस मॉडेलही हवं होतं. परंतु, प्राची यांनी थोडी अधिक किंमत असलेल्या. परंतु उत्तम गुणवत्ता असलेल्या आणि अधिक दर्जेदार अशा उत्पादनांवर भर दिला. एक जाणकार विक्रेता, व्यावसायिक म्हणून त्यांना फ्लिपकार्टसारख्या प्लॅटफॉर्मवरूनच त्यांच्या उत्पादनांची विक्री करणं योग्य वाटलं. यामुळेच त्यांच्या व्यवसायाला आणि उत्पादनांना राष्ट्रीय पातळीवरही ओळख मिळाली.
“मला माझ्या वस्तूंचा पुरवठा करायचा असल्यानं उच्च दर्जाचे दागिने तयार करण्याची क्षमता ओळखण्यासाठी मला अनेक पुरवठादारांशी संपर्क साधावा लागला. ते कंटाळवाणं आणि वेळखाऊ होतं. एकदा त्यांची क्रमवारी लावल्यानंतर फोटोग्राफर हायर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध नसल्यानं वस्तूंचे फोटो घेणं हे मोठं आव्हान होतं. परंतु, या काळात सातत्यानं फ्लिपकार्टकडून मार्गदर्शन मिळत होतं," असं प्राची यांनी सुरुवातीच्या प्रवासाबाबत सांगितलं. प्राची यांच्या मते फ्लिपकार्टचा मोठा फायदा म्हणजे तुमच्या ब्रँड व्हिसिबलिटीमुळे तुम्हाला यातून नफा मिळवता येतो. आजच्या घडीला त्यांच्या विक्रीतील ८५ टक्के वाटा हा ऑनलाइन विक्रीतून आणि ७५ टक्के वाटा हा एकट्या फ्लिपकार्टमधून येतो. आपला व्यवसाय अधिक मजूबत करण्यासह त्यांनी फ्लिपकार्टवर आपल्या GirlZFasion या ब्रँडची नोंदणी केली. या ब्रँडअंतर्गत इयररिंग्स, बांगड्या आणि नेकलेसपासून पैंजण आणि नोज पिनपर्यंत अनेक गोष्टींची विक्री केली जाते. आज व्यवसायाची आणि डिजिटल तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती असणारी व्यक्ती म्हणून त्यांच्या व्यवसायाने चांगली प्रगती केली आहे आणि कोणतीही मोठी आव्हानंही त्यांच्या समोर नाहीत. विक्रेत्यांनी वस्तूंच्या पॅकेजिंगवर लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यामुळे केवळ शिपमेंटच सुरक्षित पोहोचत नाही, तर ग्राहकांनाही एक चांगला अनुभव मिळतो, असं प्राची यांना वाटतं.
आपली इच्छा होती की, ग्राहकांनी त्यांची शिपमेंट उघडण्यापूर्वीच त्यांच्या मनात त्याबद्दल आकर्षण निर्माण व्हावं. त्यामुळे मी विविध ज्वेलरींसाठी निरनिराळ्या बॉक्सेसचा वापर केला आणि ऑथेंटिसिटीसाठी फ्लिपकार्टच्या टेपचा वापर केला. आज अनेक ग्राहकांनी, पॅकेजिंगच्या माध्यमातूनही त्यांचा किती विचार केला आहे, याची प्रशंसा केल्याचंही त्या म्हणतात. GirlZFashion या ब्रँडला २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये The Big Billion Days sale दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, ग्राहकांनीही उत्तम रिव्ह्यू दिले. एक उद्योजिका असल्यामुळे ग्राहकांची आवड, त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी, त्यांच्या भावना आणि आवश्यकता यांची माहिती घेण्यास मदत मिळाली. यामुळेच आपल्या व्यवसायाचा चौकटीबाहेर विस्तार करण्यात आणि उत्तम डिझाईन्सही तयार करण्यास प्रवृत्त केलं. प्राची यांच्या व्यवसायात त्यांना वार्षिक १० लाख रुपयांचा महसूल मिळत असून त्यात दरवर्षी २५ टक्क्यांची वाढही होत आहे. नुकतंच या ब्रँडनं महिलांसाठी स्कार्फचा व्यवसाय सुरू केला असून येत्या काळात अधिक दर्जेदार उत्पादनं आणण्याचाही विचार आहे. व्यक्तिगत पातळीवर प्राची यांच्या जीवनात बदल झाला असून त्या एक यशस्वी उद्योजिका आणि आई या दोन्ही भूमिका योग्यरित्या पार पाडत आहेत. एकूणच सांगायचं झालं तर, फ्लिपकार्टनं त्यांना संधी आणि कुटुंबीयांजवळ राहण्याची फ्लेक्सिबिलिटीही दिली आहे.