Join us  

Pension: पेन्शनसाठी अटल की एनपीएस? काेणती भारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 6:29 AM

Pension: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या २०२२-२३ मध्ये १.१९ कोटींवर पोहोचली आहे.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या २०२२-२३ मध्ये १.१९ कोटींवर पोहोचली आहे. त्याच वेळी, नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) मध्ये नावनोंदणीचा आकडा १६.६३ लाख राहिली आहे. असंघटित क्षेत्रातील गरीब लोक अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतात. तर एनपीएस हे अधिक पेन्शनसाठी सर्वात योग्य आहे.

किती मिळते पेन्शन? nअटल पेन्शन योजनेत, वयाच्या ६० वर्षांनंतर, १,००० रुपये ते ५,००० रुपयांपर्यंतची मासिक पेन्शन मिळते. पेन्शनचे प्रमाण हे सदस्याने केलेल्या योगदानावर अवलंबून असते. १८ ते ४० वयोगटातील लोक या योजनेत सामील होऊ शकतात.

तुम्ही पात्र आहात का? nतुम्ही आधीपासून कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजना, ईपीएफओ अंतर्गत समाविष्ट असल्यास, तुम्ही अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. कर भरणारे लोक आणि अनिवासी भारतीय (एनआरआय) देखील या योजनेसाठी पात्र नाहीत.

- १.१९ कोटी लोकांनी २०२२-२३मध्ये अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केली.- एनपीएस किती गुंतवणूक?- १६.६३ लाख लोकांनी एनपीएसमध्ये गुंतवणूक केली.- केंद्रीय कर्मचारी १,२८,३३७-  कार्पोरेट कर्मचारी १,५३,६५१- राज्य कर्मचारी ५,३४,८१७ - इतर लोक ८,४६,५८७ 

- ४५ हजारांच्या आसपास पेन्शन हवी असेल, तर एनपीएसमध्ये वयाच्या ३० व्या वर्षापासून दरमहा ५००० रुपये गुंतवावे लागतील. यात १.१२ कोटी रुपये जमा होतील. मॅच्युरिटीवर ४५ लाख रुपये आणि सुमारे ४५,००० रुपये आयुष्यभर पेन्शन मिळत राहील.

टॅग्स :निवृत्ती वेतन