Lokmat Money > बिझनेस न्यूज > अटल पेन्शन योजनेत मोठा बदल; 1 ऑक्टोबरनंतर आयकर भरणारे लोक गुंतवणूक करू शकणार नाहीत

अटल पेन्शन योजनेत मोठा बदल; 1 ऑक्टोबरनंतर आयकर भरणारे लोक गुंतवणूक करू शकणार नाहीत

Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजना (APY) आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 03:24 PM2022-08-11T15:24:13+5:302022-08-11T15:25:03+5:30

Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजना (APY) आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली.

atal pension yojana new rule these investors cannot join from october | अटल पेन्शन योजनेत मोठा बदल; 1 ऑक्टोबरनंतर आयकर भरणारे लोक गुंतवणूक करू शकणार नाहीत

अटल पेन्शन योजनेत मोठा बदल; 1 ऑक्टोबरनंतर आयकर भरणारे लोक गुंतवणूक करू शकणार नाहीत

नवी दिल्ली : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेच्या (Atal Pension Yojana) नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे. जी व्यक्ती आयकर भरेल, अशी कोणतीही व्यक्ती 1 ऑक्टोबर 2022 नंतर या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही, यासंदर्भातील अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे.

अटल पेन्शन योजना (APY) आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. अवघ्या 6 वर्षात ही योजना 4 कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे. या योजनेत केवळ गेल्या आर्थिक वर्षात 99 लाख लोक सामील झाले. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनुसार, आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस 4.01 कोटी लोक या योजनेत गुंतवणूक करत होते.

लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे. जे आयकर भरतात, ते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. अर्थ मंत्रालयाचा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आयकरदात्याचे खाते उघडले जाईल, त्याचे खाते बंद केले जाईल आणि खात्यात जमा केलेले पेन्शनचे पैसे ग्राहकांना परत केले जातील.

1 हजार ते 5 हजारांपर्यंत मिळते पेन्शन
अटल पेन्शन योजना (APY) ही भारतातील नागरिकांसाठी एक पेन्शन योजना आहे, जी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी चालवली जाते. अटल पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शनची हमी दिली जाते,  जी 1,000 रुपये 2,000 रुपये 3,000 रुपये 4,000 रुपये किंवा 5,000 रुपयांपर्यंत दिली जाते. ग्राहक या खात्यात पैसे जमा करतात, त्यानुसार वयाच्या 60 व्या वर्षी पेन्शन मिळते.

Web Title: atal pension yojana new rule these investors cannot join from october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.