Join us

Atal Pension Yojna : ७ कोटी लोकांचा भरवसा, तुम्हीही दररोज वाचवा ७ रुपये; नंतर ₹५००० ची पेन्शन पक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:23 PM

Atal Pension Yojana : या योजनेची सुरुवात २०१५-१६ मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेशी ७ कोटींपेक्षा अधिक लोक जोडले गेले आहेत.

प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवतो आणि तो अशा ठिकाणी गुंतवू इच्छितो जिथे आपले पैसे सुरक्षित असतील. याशिवाय आपल्याला चांगला परतावाही मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. याशिवाय काही लोक आपल्या वृद्धापकाळाची गरज लक्षात घेऊन गुंतवणूक करतात आणि अशा योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करतात ज्यात गुंतवणुकीतून निवृत्तीनंतर दरमहा एकरकमी रक्कम किंवा पेन्शन मिळतं. अशा तऱ्हेनं सरकारची अटल पेन्शन योजना चांगलीच लोकप्रिय आहे. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की सबस्क्रायबर्सची संख्या ७ कोटींवर पोहोचली आहे.

निवृत्तीनंतरचा काळ कोणत्याही आर्थिक डोकेदुखीशिवाय जावं, यासाठी सरकारची अटल पेन्शन योजना अतिशय लोकप्रिय आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास सरकार गॅरंडीट पेन्शन देते. जर तुम्ही तरुण असाल तर सुरुवातीपासूनच गुंतवणूक करुन भविष्य सुरक्षित करू शकता. यामध्ये एका चहापेक्षाही कमी किंमतीत दररोज बचत करून तुम्ही महिन्याला ५ हजारांचं पेन्शन घेऊ शकता.

मिळणार गॅरंटीड पेन्शन

ही पेन्शन योजना असून त्यात पेन्शनची हमी सरकारच देते. दररोज तुम्ही छोटीशी बचत करून या योजनेत गुंतवणूक करू शकता आणि आपल्या गुंतवणुकीनुसार १,००० रुपयांपासून ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. या योजनेतील गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

असे मिळतील ५००० रुपये

या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी किमान २० वर्ष गुंतवणूक करणं आवश्यक आहे. म्हणजे जर तुमचं वय ४० वर्ष असेल आणि तुम्ही त्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही ६० वर्षांचे झाल्यास तुम्हाला पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. पेन्शनचं गणित समजून घेण्याचा प्रयत्न करू. समजा तुम्ही १८ वर्षांचे असाल तर या योजनेत दरमहा २१० रुपये म्हणजेच दिवसाला फक्त ७ रुपये जमा करून तुम्ही ६० व्या वर्षानंतर नंतर महिन्याला ५००० रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकता. दुसरीकडे जर तुम्हाला १,००० रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला दरमहा फक्त ४२ रुपये जमा करावे लागतील.

अटल पेन्शन योजनेत पती-पत्नी मिळून १० हजार रुपयांपर्यंत पेन्शन घेऊ शकता. जर पतीचं ६० व्या वर्षापूर्वी निधन झालं तर पत्नीला पेन्शची सुविधा मिळेल. जर दोघांचाही मृत्यू झाल्यास नॉमिनीला पैसे मिळतील.

टॅग्स :सरकारगुंतवणूकज्येष्ठ नागरिक