Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईचा आणखी एक फटका; आता हवाई प्रवास महागण्याची शक्यता, इंधनाच्या दरात विक्रमी वाढ

महागाईचा आणखी एक फटका; आता हवाई प्रवास महागण्याची शक्यता, इंधनाच्या दरात विक्रमी वाढ

इंधनाच्या दरात वर्षभरात झाली आठव्यांदा वाढ. आतापर्यंत ३९ हजार रुपयांची झाली वाढ.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 05:44 PM2022-04-16T17:44:13+5:302022-04-16T17:44:46+5:30

इंधनाच्या दरात वर्षभरात झाली आठव्यांदा वाढ. आतापर्यंत ३९ हजार रुपयांची झाली वाढ.

atf prices climb to record high after 0 2 percent hike in 8th straight increase this year know details | महागाईचा आणखी एक फटका; आता हवाई प्रवास महागण्याची शक्यता, इंधनाच्या दरात विक्रमी वाढ

महागाईचा आणखी एक फटका; आता हवाई प्रवास महागण्याची शक्यता, इंधनाच्या दरात विक्रमी वाढ

विमानाने प्रवास करणे आता आणखी महाग होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. अशातच शनिवारी विमानात इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या एटीएफच्या (Aviation Turbine Fuel) किमतीतही 0.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. एटीएफच्या दरात यंदा करण्यात आलेली ही आठवी वाढ आहे.

सार्वजनिक इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एटीएफच्या किमतीत 277.5 रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच 0.2 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत एटीएफची किमत 1,13,202.33 रुपये प्रति किलोलीटरवर गेली आहेत. अशा प्रकारे एटीएफची किंमत आता विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

यापूर्वी 16 मार्च रोजी एटीएफच्या किमती तब्बल 18.3 टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यानंतर 1 एप्रिल रोजी दोन टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर, मुंबईत ATF ची किंमत आता प्रति किलो 1,11,981.99 रुपये झाली आहे, तर कोलकात्यात त्याची किंमत 1,17,753.60 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,16,933.49 रुपये प्रति किलो आहे.

आतापर्यंत ३९ हजार रुपयांची वाढ
मात्र, या वाढीनंतर आता विमान प्रवास महाग होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणत्याही विमान कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चात ४० टक्के वाटा हा एटीएफचा असतो. याच्या किंमती या वर्षी सातत्यानं वाढल्या आहे. या वर्षी आतापर्यंत झालेल्या आठ दरवाढीमध्ये एटीएफच्या किमती 39,180.42 रुपये प्रति किलोलीटरने वाढल्या आहेत.

Web Title: atf prices climb to record high after 0 2 percent hike in 8th straight increase this year know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.