Lokmat Money > बिझनेस न्यूज > एटीएमचा वापर करता? १ ऑगस्टपासून खिशाला आणखी फटका; शुल्कात 'एवढी' वाढ होणार

एटीएमचा वापर करता? १ ऑगस्टपासून खिशाला आणखी फटका; शुल्कात 'एवढी' वाढ होणार

१ ऑगस्टपासून एटीएमचा वापर महागणार; आरबीआयनं घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 04:13 PM2021-07-22T16:13:08+5:302021-07-22T16:16:07+5:30

१ ऑगस्टपासून एटीएमचा वापर महागणार; आरबीआयनं घेतला महत्त्वाचा निर्णय

ATM cash withdrawal fee to pinch more from August 1 | एटीएमचा वापर करता? १ ऑगस्टपासून खिशाला आणखी फटका; शुल्कात 'एवढी' वाढ होणार

एटीएमचा वापर करता? १ ऑगस्टपासून खिशाला आणखी फटका; शुल्कात 'एवढी' वाढ होणार

मुंबई: पेट्रोल, डिझेल, एलपीजी यांच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत असताना आता १ ऑगस्टपासून सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI)एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज फीज वाढवली आहे. याआधी १५ रुपये असलेली इंटरचेंज फीज आता १७ रुपये करण्यात आली आहे. तर नॉन बिगर वित्तीय व्यवहारांसाठी आकारण्यात येणारी फी ५ रुपयांवरून ६ रुपये करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून करण्यात येईल. 

पाच व्यवहार निशुल्क
एखादा ग्राहक त्याच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून ५ वेळा निशुल्क व्यवहार करू शकतो. यामध्ये आर्थिक आणि बिगर आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. याशिवाय ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएमचाही निशुल्क वापर करू शकतात. महानगरांमध्ये एटीएमचा निशुल्क वापर करण्याची मर्यादा तीन इतकी आहे. तर महानगरांच्या बाहेर हीच मर्यादा पाच इतकी आहे.

निशुल्क व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर पुढील एटीएम व्यवहारांवर १ जानेवारी २०२२ पासून २१ रुपये द्यावे लागतील. सध्या यासाठी २० रुपये द्यावे लागतात. बँक आणि एटीएमचा खर्च वाढल्यानं तो भरून काढण्यासाठी ग्राहकांकडून आकारण्यात येणारं शुल्क वाढवलं जाईल अशी माहिती आरबीआयनं दिली आहे.
 

Web Title: ATM cash withdrawal fee to pinch more from August 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.