Join us

Grain ATM : 'या' राज्यात आता एटीएमद्वारे मिळणार रेशन, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 5:42 PM

Grain ATM: ओडिशा सरकार रेशन डेपोवर एटीएम मशीनप्रमाणे ऑल टाइम ग्रेन म्हणजेच एटीजी (All Time Grain) मशीनमधून रेशन देण्याची तयारी करत आहे.

नवी दिल्ली : ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजेच एटीएम (ATM) मधून पैसे निघताना तुम्ही पाहिले असतील. आता अशीच एक सुविधा सुरू होणार आहे, ज्याद्वारे तुम्ही एटीएममधून धान्य सुद्धा काढू शकाल. दरम्यान, ओडिशा सरकार रेशन डेपोवर एटीएम मशीनप्रमाणे ऑल टाइम ग्रेन म्हणजेच एटीजी (All Time Grain) मशीनमधून रेशन देण्याची तयारी करत आहे.

पीटीआयच्या एका वृत्तानुसार, ओडिशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य देण्यासाठी एटीजी (ATG) मशीनचा वापर केला जाईल. अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री अतनु एस. नायक यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, एटीजी मशिन ही एटीएमप्रमाणे असेल, मात्र यामार्फत धान्य पुरवले जाईल.

सुरुवातीच्या टप्प्यात शहरी भागात ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे अतनु एस. नायक यांनी सांगितले. सर्व प्रथम भुवनेश्वरमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि राज्य अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना सेवेचा लाभ घेण्यासाठी एक विशेष कार्ड दिले जाईल, असेही अतनु एस. नायक म्हणाले.

गेल्या वर्षी देशातील पहिले 'ग्रेन एटीएम' गुरुग्राममध्ये सुरू झाले होतेदरम्यान, देशातील पहिले ग्रीन एटीएम गेल्या वर्षी हरियाणातील गुरुग्राममध्ये बसवण्यात आले होते. अन्न आणि पुरवठ्याची जबाबदारी असलेले हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले होते की, धान्याचे एटीएम बसवल्यानंतर सरकारी दुकानातून रेशन घेणार्‍यांचा वेळ आणि संपूर्ण मापाने मिळत नसल्याच्या संबंधीच्या सर्व तक्रारी दूर केल्या जातील. हे मशीन बसवण्याचा उद्देश "राइट क्वांटिटी टू राइट बेनिफिशरी" आहे. यामुळे केवळ ग्राहकांनाच फायदा होणार नाही, तर सरकारी डेपोवरील धान्य टंचाईचा त्रासही संपेल, असे ते म्हणाले होते.

टॅग्स :ओदिशाव्यवसाय