Join us  

ATM: तुमचं नाव नाही, ‘पिन’ हीच तुमची ओळख!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 5:34 AM

ATM: ‘मेरा नामही मेरी पहचान है’, असा आपला गैरसमज असेल तर तो आजच्या जमान्यात चुकीचा ठरला आहे. एक चार-सहा आकड्यांचा किंवा काही तशा निरर्थक अक्षरांचा समुच्चय हीच आता आपली खरी ओळख झालेली आहे.

- ग्राहक प्रबोधन आणि संशोधन संस्था, नाशिक  तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com

‘मेरा नामही मेरी पहचान है’, असा आपला गैरसमज असेल तर तो आजच्या जमान्यात चुकीचा ठरला आहे. एक चार-सहा आकड्यांचा किंवा काही तशा निरर्थक अक्षरांचा समुच्चय हीच आता आपली खरी ओळख झालेली आहे. व्यवहारी भाषेत त्याला पिन (वैयक्तिक ओळख क्रमांक) म्हणून आपण ओळखतो. बऱ्याचदा हा पिन आपल्याला आपली बँक किंवा तत्सम सेवादार संस्था देते आणि नंतर तो आपल्याला बदलता येतो. आपण जितके जास्त ऑनलाइन व्यवहार करीत असू तितक्या जास्त वेळा पिन्स आपल्याला वापरावे लागतात. ते पिन्स आपल्याला स्मरणात ठेवायला लागतात. मुळात आपला पिन ही आपली अत्यंत खासगी गोष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याबद्दलची माहिती  दुसऱ्या व्यक्तीला देणे धोकादायक असते.

आपला  पिन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अनधिकृत पद्धतीने तो चोरला जाणार नाही यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. आपल्याला अनाहूतपणाने मदत करायला येणारे ‘समाजसेवक’ मदत करण्याचे नाटक करून आपला पिन चोरतात. त्यांचा डाव ओळखून सुरक्षितता बाळगावी लागते. अनेकदा आपला पिन लक्षात राहावा म्हणून तो लिहून ठेवायचा असेल तर तो अत्यंत  सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक असते. आपला पिन एंटर करताना इतरांना तो पाहण्यापासून रोखण्यासाठी कीपॅड झाकून ठेवले पाहिजे. पिन एंटर करताना लक्ष ठेवा आणि संशयास्पद हालचालींकडे लक्ष द्या. जन्मतारीख किंवा फोन नंबर यासारखे नंबर वापरू नका.

पिन चोरला जाण्याचा धोका कमी करण्यासाठी प्रत्येक खाते किंवा डिव्हाइससाठी वेगळा पिन वापरा. आपला पिन ठरावीक काळानंतर  बदलला पाहिजे. अपरिचित किंवा असुरक्षित उपकरणांवर तुमचा पिन वापरताना अधिक सावधगिरी बाळगा. शक्य असल्यास फिंगरप्रिंट किंवा फेशियल रेकग्निशन यासारख्या बायोमेट्रिक पद्धतींचा वापर करणे उचित ठरते.  ज्याचा अंदाज लावता येणार नाही आणि ज्याची चोरी करणे अवघड होईल असा मजबूत पिन निवडणे आवश्यक आहे. मजबूत पिनमध्ये अपरकेस आणि लोअरकेस अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णांचे मिश्रण असावे.

टॅग्स :एटीएमबँकिंग क्षेत्र