नवी दिल्ली - एटीएम ट्रान्झेक्शनसाठी बँकेचे काही नियम आहेत. सर्वसामान्यपणे बँकेकडून 3 पेक्षा अधिकचे एटीएम ट्रान्झेक्शन केल्यास त्यावर शुल्क लावले जाते. मात्र, एक अशीही बँक आहे जी आपल्या ग्राहकांना अमर्याद मोफत एटीएम ट्रान्झेक्शनची सुविधा देते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) असं या बँकेचं नाव आहे. या बँकेने वर्ल्ड सीनियर सिटीजन डेच्या दिवशी या सुविधेची घोषणा केली.
बँकेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक बँक ब्रँच आणि एटीएम दोन्हीमधून अनलिमिटेड मोफत व्यवहार करू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. बँकेच्या या घोषणेनंतर ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बँकेने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटला रिप्लाय करत अनेक ग्राहकांनी बँकेच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. तसेच डिजिटल बँकिंग सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
Enjoy unlimited transactions at any Ujjivan Small Finance Bank ATM or bank branch. Withdraw and deposit money without any second thoughts. Wishing you a very happy World Senior Citizens Day!#UjjivanSFB#WorldSeniorCitizensDaypic.twitter.com/Vt3DuUpJb6
— Ujjivan Small Finance Bank (@UjjivanBank) August 21, 2021
जूनमध्ये आरबीआयने एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले होते. यानुसार आर्थिक व्यवहारांसाठी 15 रुपयांपासून 17 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येतं. इतर व्यवहारांसाठी 5 ते 6 रुपये प्रति व्यवहार शुल्क आकारण्यात येतं. 1 ऑगस्ट 2021 पासून हे नियम लागू आहेत. जर तुम्ही उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला बँकेच्या कोणत्याही व्यवहारासाठी शुल्क लागणार नाही. बँकेने आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड ट्रान्झेक्शनची सुविधा दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.