Join us

बँकेतून पैसे कापले गेले, पण ATM मधून आलेच नाहीत; सर्वप्रथम काय करावं? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:39 PM

अशा परिस्थितीत, तुम्ही काय करावं किंवा तुमच्या बँक खात्यात पैसे परत येण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

तुम्ही एटीएम मशिनचा वापर पैसे काढण्यासाठी केला असेल आणि तुम्हाला रक्कम मिळाली नाही, इतकंच नाही तर खात्यातून पैसेही कापले गेले असतील असं नक्कीच तुम्ही ऐकलं असेल. अशा परिस्थितीत, तुम्ही काय करावं किंवा तुमच्या बँक खात्यात पैसे परत येण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मात्र, यादरम्यान कोणत्याही व्यक्तीसोबत असं घडल्यास त्यांनी सर्वप्रथम बँकेला कळवावं.रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार, एटीएम व्यवहार अयशस्वी होऊनही तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले किंवा डेबिट केले गेले, तर बँकांना व्यवहाराच्या तारखेपासून पाच दिवसांच्या आत कापले गेलेले पैसे परत करावे लागतील. बँकांनी असं केलं नाही तर त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. डेबिट केलेल्या पैशाच्या ऑटो-रिव्हर्समध्ये डिफॉल्ट झाल्यास, दररोज १०० रुपयांपर्यंत भरपाई बँकेला द्यावी लागेल. व्यवहाराच्या तारखेपासून पैसे खात्यात परत जमा होईपर्यंत भरपाईची गणना केली जाते.सर्वप्रथम काय करालअशा परिस्थितीत, सर्वप्रथम त्या एटीएम मशीनचा नंबर (तो एटीएमच्या समोर दिलेला असतो) नोट करून ठेवा आणि एटीएम व्यवहाराची स्लिप (मिळल्यास) सुरक्षितपणे ठेवा. यानंतर, तुम्ही तुम्हाला बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून या प्रकरणाची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. अशी प्रकरणं तात्काळ बँकेला कळवावीत. तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊनही तुमची तक्रार नोंदवू शकता.समजा तुम्हाला एटीएममधून पैसे मिळाले नाहीत हे बँकेनं मान्य केलं नाही. तर अशा परिस्थितीत, एक थ्री टायर अथॉरिटी आहे जिथे तुम्ही तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी संपर्क करू शकता. जर बँकेनं चुकीच्या पद्धतीने डेबिट केलेली रक्कम विहित मुदतीत परत केली नाही, तर त्या व्यक्तीला प्रथम बँकेच्या अंतर्गत लोकपालाशी संपर्क साधावा लागेल.प्रत्येक बँकेचे अंतर्गत लोकपाल कार्यालय आणि त्यासाठी एक डेडिकेटेड अधिकारी असतो. बँकेच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी, एखादी व्यक्ती त्याच्या बँकेच्या अंतर्गत लोकपालच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकते. त्यानंतर त्यानं आपल्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून या प्रकरणाची संपूर्ण माहिती द्यावी. अशी प्रकरणे तात्काळ बँकेला कळवावीत. तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊनही तुमची तक्रार नोंदवू शकता.जर व्यक्ती बँकेच्या अंतर्गत लोकपालच्या प्रतिसादांवर तुम्ही समाधानी नसाल, तर आरबीआय लोकपाल प्रणालीशी संपर्क साधू शकता. आरबीआयची एक समर्पित ऑनलाइन लोकपाल वेबसाइट आहे आणि आरबीआयने लोकपाल अधिकारी देखील नियुक्त केले आहेत ज्यांच्याशी लोक त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी संपर्क करू शकतात.यापैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करून व्यक्ती आपली तक्रार नोंदवू शकतात. जर ती व्यक्ती आरबीआयच्या प्रतिसादाने समाधानी नसेल तर तो वाद सोडवण्यासाठी ग्राहक न्यायालयात जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्याच्याकडे त्याच्या खात्यातून पैसे कापले गेले, पण मिळाले नाहीत, हे सिद्ध करणारा पुरावा असला पाहिजे.

टॅग्स :एटीएमपैसाभारतीय रिझर्व्ह बँक