उज्जैन/इंदोर : पेट्रोल आणि डिझेलला वस्तू व सेवा कराच्या कक्षेत (जीएसटी) आणण्यासाठी आपले मंत्रालय प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन देशाचे तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.
प्रधान यांनी उज्जैन येथे पत्रकारांना सांगितले की, पेट्रोल, डिझेल आणि केरोसिन ही इंधनद्रव्ये जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर जीएसटी परिषद लवकरच सहमती दर्शवील, अशी आम्हाला आशा आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीबाबत छेडले असता प्रधान म्हणाले की, आंतरराष्टÑीय बाजारात इंधनाचे दर वाढल्यामुळे भारतात किमती वाढत आहेत. याशिवाय राज्य सरकारांनी इंधनावर कर लावलेला आहे.
इंदोर येथे प्रधान यांनी ‘इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देण्यासाठी ‘सक्षम सायक्लॉथॉन’मध्ये भाग घेऊन सायकल चालविली. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्था (पीसीआरए) आणि इंदोर सायकलिंग असोसिएशन (आयसीए) यांनी संयुक्तपणे ही सायक्लॉथॉन आयोजित केली होती. ३० हजार सायकलस्वारांनी त्यात भाग घेतला. याप्रसंगी प्रधान यांनी सांगितले की, सायकलीमुळे आरोग्यदायी जीवन लाभते आणि इंधनाचे संवर्धन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वाचविण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे.
मोदी सरकार ग्राहकविरोधी : चिदंबरम
माजी केंद्रीय वित्तमंत्री तथा काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराबाबत मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली. मोदी सरकार ग्राहकविरोधी आहे, असे ते म्हणाले.
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न : धर्मेंद्र प्रधान
पेट्रोल आणि डिझेलला वस्तू व सेवा कराच्या कक्षेत (जीएसटी) आणण्यासाठी आपले मंत्रालय प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन देशाचे तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:16 AM2018-01-23T01:16:30+5:302018-01-23T01:16:43+5:30