Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावधान! ITR भरणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; ...अन्यथा बसेल 5000 रुपयांचा फटका

सावधान! ITR भरणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; ...अन्यथा बसेल 5000 रुपयांचा फटका

आपण ओल्‍ड कर प्रणाली अथवा नव्या कर प्रणाली अंतर्गत आयकर भरू शकता अथवा आयटीआर फाइल (ITR File) करू शकता. या दोन्ही कर प्रणालीत टॅक्स स्लॅब वेगवेगळा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:47 AM2023-06-26T10:47:03+5:302023-06-26T10:47:34+5:30

आपण ओल्‍ड कर प्रणाली अथवा नव्या कर प्रणाली अंतर्गत आयकर भरू शकता अथवा आयटीआर फाइल (ITR File) करू शकता. या दोन्ही कर प्रणालीत टॅक्स स्लॅब वेगवेगळा आहे.

attention Government's big announcement for ITR filers otherwise there will be a penalty of Rs.5000 | सावधान! ITR भरणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; ...अन्यथा बसेल 5000 रुपयांचा फटका

सावधान! ITR भरणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; ...अन्यथा बसेल 5000 रुपयांचा फटका

आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यासाठी 31 जुलै 2023 ही अखेरची तारीख असेल. याअंतर्गत टॅक्‍सेबल इनकम असलेल्या लोकांना इनकम टॅक्स रिटर्न फाइल करावा लागत असतो. आपण ओल्‍ड कर प्रणाली अथवा नव्या कर प्रणाली अंतर्गत आयकर भरू शकता अथवा आयटीआर फाइल (ITR File) करू शकता. या दोन्ही कर प्रणालीत टॅक्स स्लॅब वेगवेगळा आहे.

आपल्याला टॅक्स भरावा लागत असले तर आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलैपर्यंत ITR दाखल करावा लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून (CBDT) फेब्रुवारी महिन्यात ITR फॉर्म जारी करण्यात आले होते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही कंपन्यांकडून फॉर्म-16 जारी करण्यात आला होता. आता जस-जशी 31 जुलै  तारीख जवळ येईल, तस-तसे इनकम टॅक्‍सच्या वेबसाइटवर ट्रॅफिक वाढत जाईल. यामुळे आपण वेळीच आयटीआर फाईल करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे, वैयक्तिक आयकर भरणारे, व्यवसाय आणि कंपन्यांसाठी सात प्रकारचे ITR फॉर्म असतात.

केव्हा भरावा लागेल दंड -
या वर्षी आयटीआर दाखल करण्याची अखेरची तारीख 31 जुलै आहे. अशात आपण 31 जुलैपर्यंत आयटीआर भरू शकला नाहीत, तर आपल्याकडे 31 डिसेंबरपर्यंतची मुदत असेल. 31 डिसेंबरपर्यंत आपण लेट रिटर्न फाइलसह आयटीआर फाइल करू शकता. यात आपल्याला 5,000 रुपये एवढा दंड भरावा लागेल.

आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2023 नंतर आयटीआर भरणाऱ्यांना 5,000 रुपये दंड भरावा लागेल. तसेच यानंतरही, जर देय तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही, तर यानंतर रक्कम दुप्पट होऊ शकते.

Web Title: attention Government's big announcement for ITR filers otherwise there will be a penalty of Rs.5000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.