Join us  

Fincare बँकेचे AU स्मॉल फायनान्स बँकेत मर्जर; शेअर होल्डर्सवर काय परिणाम होणार, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 4:06 PM

AU-Fincare Merger : AU स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकेचे मर्जरन झाले आहे.

AU-Fincare Merger : देशातील दोन मोठ्या स्मॉल फायनान्स बँकांचे विलीनीकरण झाले आहे. Fincare Small Finance Bank (Fincare SFB) या बँकेचे AU Small Finance Bank (AU SFB) मध्ये विलीनीकरण झाले आहे. या दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी 29 ऑक्टोबर रोजी ऑल स्टॉक मर्जरसाठी मान्यता दिली. बँकिंग कायदा, 1949 च्या कलम 44A अंतर्गत, विलीनीकरणासाठी दोन्ही बँकांच्या शेअरधारकांची, RBI आणि भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी आवश्यक आहे.

हे विलिनीकरण 1 फेब्रुवारी 2024 पासून लागून होईल. आवश्यक मंजूरी मिळाल्यानंतर, Fincare SFB AU SFB मध्ये विलीन केली जाईल. Fincare SFB च्या शेअरधारकांना AU SFB चे शेअर्स त्यांच्या Fincare SFB मधील शेअर्सच्या बदल्यात मंजूर शेअर स्वॅप रेशोवर मिळतील. तसेच, Fincare SFB चे सर्व कर्मचारी AU SFB मध्ये सामील होतील.

Fincare SFB मध्ये 700 कोटी रुपयांची गुंतवणूकमर्जरच्या अटींनुसार, Fincare SSB चे प्रवर्तक विलीनीकरण पूर्ण होण्यापूर्वी Fincare SFB मध्ये 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. हे संबंधित मंडळाने मान्य केले आहे. AU SFB ने म्हटले आहे की, विलीनीकरणानंतर फिनकेअर SFB चे सर्व कर्मचारी AU SFB मध्ये सामावून घेतले जातील. तसेच, फिनकेअर एसएफबीच्या संचालक मंडळाच्या विद्यमान संचालक दिव्या सेहगल या एयू एसएफबीच्या संचालक मंडळात सामील होतील.

फिनकेअरच्या 2000 शेअर्सवर AU चे 579 शेअर्सFincare SFB शेअरधारकांना Fincare SFB च्या प्रत्येक 2,000 शेअर्समागे AU SFB मध्ये 579 शेअर्स मिळतील. विलीनीकरणानंतर, Fincare SFB चे विद्यमान शेअरधारक AU SFB मधील 9.9% स्टेक ठेवतील. Fincare SFB चे MD आणि CEO राजीव यादव यांची विलीनीकरणानंतर AU SFB चे उप CEO म्हणून नियुक्ती केली जाईल. ते AU SFB चे MD आणि CEO संजय अग्रवाल यांना रिपोर्ट करतील. यादव AU SFB च्या Fincare युनिटचे नेतृत्व करत राहतील, ज्यात Fincare SFB चे बहुतांश व्यवसाय असतील.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकगुंतवणूकव्यवसाय