Lokmat Money > बिझनेस न्यूज > अबब, ३४७५ कोटींची कीटकनाशके बनावट

अबब, ३४७५ कोटींची कीटकनाशके बनावट

भारतातील बनावट कीटकनाशकांच्या वाढत्या विक्रीबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. भारतात विक्री होणाऱ्या एकूण कीटकनाशकांपैकी एक चतुर्थांश म्हणजेच ३,४७५ कोटींची बनावट

By admin | Published: October 1, 2015 12:03 AM2015-10-01T00:03:23+5:302015-10-01T00:03:23+5:30

भारतातील बनावट कीटकनाशकांच्या वाढत्या विक्रीबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. भारतात विक्री होणाऱ्या एकूण कीटकनाशकांपैकी एक चतुर्थांश म्हणजेच ३,४७५ कोटींची बनावट

Aub, fake pesticides of 3475 crores | अबब, ३४७५ कोटींची कीटकनाशके बनावट

अबब, ३४७५ कोटींची कीटकनाशके बनावट

नवी दिल्ली : भारतातील बनावट कीटकनाशकांच्या वाढत्या विक्रीबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. भारतात विक्री होणाऱ्या एकूण कीटकनाशकांपैकी एक चतुर्थांश म्हणजेच ३,४७५ कोटींची बनावट कीटकनाशके विकली जातात, असे निरीक्षण टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपने एका अभ्यासाद्वारे व्यक्त केले आहे.
कीटकनाशकांच्या निर्मितीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. या क्षेत्रात २०१४ मध्ये भारतात २.३ अब्ज डॉलर्स एवढी उलाढाल झाली होती, ती २०१८-१९ मध्ये ४.२ अब्ज डॉलर्सवर जाईल, असे भाकीत टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपने व्यक्त केले आहे.
कृषी विभागाकडून रब्बी व खरीप हंगामात बनावट कीटकनाशकांची विक्री रोखण्यासाठी अनेकदा छापे टाकले जातात. विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. कीटकनाशकांच्या उत्पादकांकडूनही बनावट औषधांबाबत जनजागृती केली जाते, मात्र त्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.
बनावट कीटकनाशकांच्या विक्रीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपचे मनिष पांचाळ यांनी सांगितले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी, उत्पादक व नियामक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज पांचाळ यांनी अधोरेखित केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Aub, fake pesticides of 3475 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.