Join us

मल्ल्याच्या मालमत्तांचा पुन्हा २७ नोव्हेंबरला लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 6:51 AM

बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा फरार मालक विजय मल्ल्या याच्या मालमत्तांचा आता १७ नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे.

मुंबई : बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा फरार मालक विजय मल्ल्या याच्या मालमत्तांचा आता १७ नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. हा लिलाव आॅनलाइन असेल, असे सांगण्यात आले. त्याच्या मालमत्तांसाठी आता आठव्यांचा लिलाव पुकारण्यात आला आहे.किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्याने भारतातील बँकांच्या कर्जांची परतफेड केलेली नाही आणि तो पळून इंग्लंडला गेला आहे. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने केली आहे. त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. ते प्रकरण लंडन न्यायालयात सुरू आहे. त्याला ५ जानेवारी रोजी पीएमएलए न्यायालयाने फरार घोषित केले आहे.एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने (ईडी) त्याच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. विजय मल्ल्यावर विविध बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या तीन वर्षांत विजय मल्ल्याच्या मालमत्तांचा आठ वेळा लिलाव जाहीर करण्यात आला. पण त्या लिलावांना प्रतिसाद मिळाला नाही. बंगळुरू येथील कर्ज वसुली प्राधिकरणाने आता लिलावाची घोषणा केली आहे.ज्या मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे, त्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाजवळील किेंगफिशर हाऊ सचा समावेश आहे. इमारतीचे बांधकाम १५८६ चौरस मीटरचे असून, तो भूखंड २४0२ चौरस मीटर आकाराचा आहे. मात्र त्याच्या भोवताली बरेच अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे लिलावात ती इमारत विकत घेणाऱ्यास प्रत्यक्ष १६७७ चौरस मीटर आकाराचा भूखंड मिळेल, असे सांगण्यात येते. पण ती मोक्याची जागा आहे.विदेशी मालमत्तांवर आणणार टाचस्टेट बँक आॅफ इंडियासह अन्य बँकांनी दिलेल्या कर्जातील ६२0३ कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी हा लिलाव होत आहे, असे कर्जवसुली प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.मल्ल्याच्या आतापर्यंत भारतातील जवळपास सर्व मालमत्ता हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याच्या अमेरिका, युरोप, इंग्लंड व अन्य देशांमधील मालमत्ता ताब्यात घेण्याच्या दृष्टीनेही ईडीने तयारी सुरू केली आहे. विजय मल्ल्या २0१६ साली भारतातून पळून गेला आहे.

टॅग्स :विजय मल्ल्याव्यवसाय