नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये भारतात वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली. कार उत्पादन क्षेत्रातील मारुती सुझुकी, महिंद्रा आणि ह्युंदाई या कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली. रॉयल एनफिल्डच्या मोटारसायकल विक्रीतही मोठी वाढ झाली. व्यावसायिक वाहन क्षेत्रातील अशोक लेलँड आणि व्हीईच्या विक्रीतही वाढ झाली.
भारतातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कार विक्रीत सप्टेंबरमध्ये ३.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने १,१३,७५९ कार या महिन्यात विकल्या. गेल्यावर्षी याच अवधीत १,0९,७४२ कारची विक्री झाली होती.
महिंद्राच्या कार विक्रीत ५ टक्क्यांची वाढ झाली. ह्युंदाईच्या कार विक्रीत घसघशीत ९.८३ टक्क्यांची वाढ झाली. रॉयल एनफिल्डच्या विक्रीत ५९ टक्के वाढ झाली. हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत अल्प प्रमाणात वाढ झाली. अशोक लेलँडच्या वाहन विक्रीत तब्बल ६0.८१ टक्के वाढ झाली.
सप्टेंबरात वाहन विक्री जोरात
सप्टेंबरमध्ये भारतात वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली. कार उत्पादन क्षेत्रातील मारुती सुझुकी, महिंद्रा आणि ह्युंदाई या कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली
By admin | Published: October 1, 2015 10:12 PM2015-10-01T22:12:10+5:302015-10-01T22:12:10+5:30