Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘कितना देती है?’ कार घेणाऱ्यांचा प्रश्न बदलला, जागरुकता वाढली, मानसिकता बदलली

‘कितना देती है?’ कार घेणाऱ्यांचा प्रश्न बदलला, जागरुकता वाढली, मानसिकता बदलली

Automobile : कार खरेदी करणारे आता मायलेज नव्हे तर गाडी किती सुरक्षित आहे, क्रॅश रेटिंग किती आहे या गाेष्टी पाहत आहेत. ग्राहकांमध्ये कार खरेदीबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 09:05 AM2023-06-30T09:05:32+5:302023-06-30T09:06:02+5:30

Automobile : कार खरेदी करणारे आता मायलेज नव्हे तर गाडी किती सुरक्षित आहे, क्रॅश रेटिंग किती आहे या गाेष्टी पाहत आहेत. ग्राहकांमध्ये कार खरेदीबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.

Automobile : 'Kitna deti hai?', the question of car buyers has changed, awareness has increased, mindset has changed | ‘कितना देती है?’ कार घेणाऱ्यांचा प्रश्न बदलला, जागरुकता वाढली, मानसिकता बदलली

‘कितना देती है?’ कार घेणाऱ्यांचा प्रश्न बदलला, जागरुकता वाढली, मानसिकता बदलली

नवी दिल्ली : कार खरेदी करण्यापूर्वी अनेक गाेष्टींचा विचार केला जाताे. त्यात प्रामुख्याने एक लीटर पेट्राेलमध्ये किती किलाेमीटर कार धावणार, ही बाब सर्वप्रथम विचारली जाते. मात्र, हा झाला इतिहास. कार खरेदी करणारे आता मायलेज नव्हे तर गाडी किती सुरक्षित आहे, क्रॅश रेटिंग किती आहे या गाेष्टी पाहत आहेत. ग्राहकांमध्ये कार खरेदीबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.

सर्वात महत्त्वाचे काय?
कार खरेदीचा निर्णय घेताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्रॅश रेटिंग आणि एअरबॅग्सची संख्या हे दाेन मुद्दे प्रभावित करणारे आढळले. तिसऱ्या स्थानी गाडीचा मायलेज हाेता.

९२% लाेकांना क्रॅश टेस्टिंग केलेली आणि सुरक्षा रेटिंगवाली गाडी हवी.
२१.३% लाेकांची ४ स्टार रेटिंगसाठी पसंती
६७% लाेकांकडे स्वत:ची कार

४७.६% सुरक्षेच्या फिचर्सकडे जास्त महत्त्व देतात.
५ लाखांपेक्षा जास्त किमतीची कार या लाेकांकडे हाेती.
९०% ग्राहकांना देशातील सर्व कारची सुरक्षा रेटिंग हवी.
३३% लाेक वर्षभरात ५ लाख किंवा जास्त रुपयांची कार खरेदी करण्यास इच्छुक
२२.३% लाेकांचा कल ५ स्टार क्रॅश रेटिंगवर हाेता

हे अजूनही दुर्लक्षितच
सुरक्षेबाबत ग्राहकांमध्ये जागरुकता वाढली आहे. तरीही लहान मुले व मागच्या सीटवर बसलेल्यांसाठी कारच्या सुरक्षा रेटिंगबाबत अजूनही हवी तेवढी जागरूकता नाही. हे प्रमाण केवळ ३० टक्केच असल्याचे सर्वेक्षणात आढळले.

Web Title: Automobile : 'Kitna deti hai?', the question of car buyers has changed, awareness has increased, mindset has changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.