मुंबई : पर्यावरणपूरक ई-वाहन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आता केवळ दुचाकी नाही तर त्याखेरीज पाच क्षेत्रांवर ‘फोकस’ केला जाणार आहे. यासाठी वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या ‘एसएमईव्ही’ या संघटनेने पुढाकार घेतला आहे. ‘सोसायटी फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया’ (एसएमईव्ही) ही देशातील १२ प्रमुख ई-वाहने तयार करणाºया कंपन्यांची संघटना दहा वर्षांपासून कार्यरत आहे. आतापर्यंत संघटनेचा ‘फोकस’ केवळ इलेक्ट्रिक दुचाकीवर होता; पण २०३०पर्यंत देशातील सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले आहे. हे लक्ष्य केवळ दुचाकीद्वारे पूर्ण होणे अशक्य असल्याने एसएमईव्हीने आता संघटनेत रचनात्मक बदल केला आहे.
एसएमईव्हीची वार्षिक बैठक अलीकडेच झाली. त्यामध्ये दुचाकीखेरीज बसेस व मालवाहतुकीसाठी छोटे टेम्पो हे व्यावसायिक वाहनसुद्धा इलेक्ट्रिक श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार आता व्यावसायिक ई-वाहन, तीनचाकी (ई-रिक्षा, ई-कार्ट), दुचाकी (वेगवान ई-सायकली) व ई-चारचाकी (वैयक्तिक मोटारीसह हलकी व्यावसायिक वाहने) या चार प्रकारांत येत्या काळात अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यावर संघटना ‘फोकस’ करणार आहे. या चारही श्रेणीत वाहननिर्मिती करणाºया कंपन्यांशी समन्वय साधण्यासाठी चार उद्योजकांची प्रमुख म्हणून बैठकीत निवड करण्यात आली. यानुसार आता येत्या काळात संघटना इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात निश्चित उद्दिष्टासह जोमाने काम करेल, असे एसएमईव्हीचे संचालक सोहिंदर गिल यांनी सांगितले.
।सुटे भाग तयार करण्यावरही भर देणार
ई-वाहनांसाठी लागणारी सामग्री, सुट्या भागांचे देशात जोमाने उत्पादन केल्याखेरीज ही वाहने स्वस्त होणार नाहीत. यासाठीच एसएमईव्हीने असे सुटे भाग तयार करणाºया कंपन्यांवरही लक्ष्य केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही उपविभाग स्थापन करण्यात आला आहे.
।ई-वाहनांची जबाबदारी यांच्यावर
व्यावसायिक ई-वाहन : सुशांत नायक (टाटा मोटर्स)
तीनचाकी ई-वाहन : सुलाजा फिरोदीया मोटवानी (कायनॅटिक ग्रीन)
दुचाकी ई-गाड्या : मनू शर्मा (हिरो इलेक्ट्रिक)
चारचाकी ई-वाहन : पवन सचदेवा (महिंद्रा इलेक्ट्रिक)
ई-वाहन सुटे भाग : गुरूप्रसाद पुदलापूर (बॉश)
ई-वाहनांमध्ये दुचाकींसह रिक्षा, बसेस व कारही
पर्यावरणपूरक ई-वाहन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आता केवळ दुचाकी नाही तर त्याखेरीज पाच क्षेत्रांवर ‘फोकस’ केला जाणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:31 AM2018-06-21T03:31:09+5:302018-06-21T03:31:09+5:30