मुंबई : वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी मोजण्यात व्यापा-यांना अनेक अडचणी येत आहेत. मात्र, आता उपलब्ध झालेल्या आॅफलाइन जीएसटी कॅल्क्युलेटर या सॉफ्टवेअरमुळे हे काम अधिक सुलभ झाले आहे. ‘क्लीअरटॅक्स’ कंपनीने तयार केलेला हा जीएसटी कॅल्क्युलेटर कोणत्याही संगणकावर विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे.रोख रकमेचे बचत भांडवल, क्रेडिट लेजर्स, रिव्हर्स चार्ज प्रणालीअंतर्गत नोंदवलेल्या खरेदीच्या नोंदी आदी मूलभूत माहिती भरून व्यापारी, सीए, तसेच कर व्यावसायिकांना या सुविधेद्वारे त्यांचे पूर्ण कर व्यवहार पडताळून पाहता येणार आहेत. ही सर्व माहिती भरल्यानंतर व्याज, विलंब शुल्क यासह जीएसटी थकबाकी आपोआप कॅल्क्युलेट केली जाणार आहे.
आॅफलाइन जीएसटी कॅल्क्युलेटर उपलब्ध, वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी मोजण्यात व्यापा-यांना अनेक अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 5:11 AM